जाहिरात

Sangli News: भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात, पाच जण जखमी, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत

सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे.

Sangli News: भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात, पाच जण जखमी, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत
BJP Mla Sudhir Gadgil Car Accident News

शरद सातपुते, प्रतिनिधी

BJP MlA Sudhir Gadgil Car Accident :  सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडगीळ यांच्यासह चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकाच्या उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरज जवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला.यामध्ये गाडगीळ यांच्या चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

नक्की वाचा >> Kolhapur News: शिवसेना UBT नेत्याने उडवली खळबळ ! शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

आमदार गाडगीळ यांची प्रकृती स्थिर

अपघातात गाडगीळ यांच्या बोटाला मार लागला आहे. तर गाडगीळ यांच्या वाहनाचे चालक,स्वीय सहायक,अंगरक्षकासह चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.दरम्यान,गाडगीळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Ashadhi Wari: आषाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खुशखबर! पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या, पाहा संपूर्ण वेळापत्रक

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com