जाहिरात

Vita News : नाद करायचा नाय! लेक अन् जावयासाठी सांगलीतील शेतकरी बापाने आणलं हेलिकॉप्टर 

लेकीचं लग्न धुमधडाक्यात व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. त्यासाठी बाप आयुष्यभरात जमवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी खर्च करतो.

Vita News : नाद करायचा नाय! लेक अन् जावयासाठी सांगलीतील शेतकरी बापाने आणलं हेलिकॉप्टर 

शरद सातपुते, प्रतिनिधी

सांगलीतील विटातून एक आगळंवेगळं प्रकरण समोर आलं आहे. लेकीचं लग्न धुमधडाक्यात व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. त्यासाठी बाप आयुष्यभरात जमवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी खर्च करतो. प्रत्येक बाप आपआपल्या परीने जसं जमेल तसं लेकीचं लग्न उत्साहात करण्याचा प्रयत्न करतो. विटात मात्र या बापाने आपल्या लेकीच्या एन्ट्रीसाठी चक्क हेलिकॉप्टर आणल्याचं समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आर्थिक सुबत्ता आल्याने या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं आहे. अशातच आता विटयातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी चक्क हेलिकॉप्टर बोलावलं आणि ही वरात मंगल कार्यालयापर्यंत वाजत - गाजत आणली. 

HSC Result 2025: 'वैभवी तुझ्या जिद्दीला सलाम.', अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या लेकीचे कौतुक

नक्की वाचा - HSC Result 2025: 'वैभवी तुझ्या जिद्दीला सलाम.', अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या लेकीचे कौतुक

आपल्या मुलीचं लग्न सर्वांच्या आठवणीत राहावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं हा वधूपिता अनंत लक्ष्मण माळी यांनी सांगितलं. विटा शहरातील अनंत लक्ष्मण माळी या प्रगतशील शेतकऱ्याची कन्या अनुजा हिचा चिंचवड पुणे येथील चिरंजीव परिमल शंकर कोरे यांच्याशी ठरला. आपल्या लेकीचा विवाह सोहळा नातेवाईकांसह सर्वांच्या कायम आठवणीत राहावा, यासाठी शेतकरी अनंत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाहात काहीतरी हटके करण्याचं निश्चित केलं होतं.

त्यामुळे नवरी अनुजा आणि नवरदेव चिरंजीव परिमल यांची मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वडिलांनी मुलीच्या लग्नात हेलिकॉप्टर आणले. त्यानुसार वधू-वराची एन्ट्री थेट विटयातील श्री मंगल कार्यालयापर्यंत आली. लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पार पडला. मात्र या नवरी-नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून झालेल्या एन्ट्रीची चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com