स्वानंद कुलकर्णी, बीड
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. संतोष देशमुख यांना आपलं बरंवाईट होईल यांची पूर्वकल्पना होती, असा अंदाज मुलगी वैभवी देशमुख हिच्या जबाबातून लावण्यात येत आहे. आपल्या मृत्यूच्या एकदिवस आधी संतोष देशमुख यांनी वैभवीकडे काळजी व्यक्त केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अवादा कंपनीबाहेर झालेल्या राड्यानंतर संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले इतर गुंडांकडून धमक्या येत होत्या, असा अंदाज आहे. विष्णू चाटे याने देखील संतोष देशमुख यांना फोन केला होता. त्यावेळी एवढं कशाल ताणता, अशी विनंती देखील संतोष देशमुख यांनी विष्णू चाटे यांना केली होती. वैभवी देशमुखने नोंदवलेल्या जबाबतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)
वैभवीच्या जबाबात काय?
वैभवीने आपल्या जबाबात सांगितलं की, माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे, असं वडील संतोष देशमुख यांनी तिला म्हटलं होतं. आरोपी विष्णूने चाटेने कॉल केला होता तेव्हा संतोष देशमुख यांनी म्हटलं की, भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ. एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? संतोष देशमुख यांचा हा फोन 10 ते 12 मिनिटे सुरू होता, असं वैभवीने जबाबात सांगितलं.
(नक्की वाचा- Beed News : महादेव मुंडे हत्या प्रकरण; वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची पोलिसांकडून चौकशी)
देशमुख यांचं कुटुंब वैभवी आणि विराजच्या शिक्षणासाठी लातूर येथे वास्तव्यास होतं. लातूर येथे धनंजय देशमुख हे कुटुंबाला भेटण्यासाठी गेले असता हा कॉल विष्णू चाटे याने केला होता, असा वैभवीच्या जवाबात उल्लेख आहे. कॉल 8 डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आला होता.