जाहिरात

Santosh Deshmukh's Dog : संतोष देशमुखांचा 'राजू' अजूनही मंडपातच; पण भाऊ म्हणाले, 'त्याचा मालक आता....'

राजूला कसं सांगणार त्याचा मालक या जगात नाही, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

Santosh Deshmukh's Dog : संतोष देशमुखांचा 'राजू' अजूनही मंडपातच; पण भाऊ म्हणाले, 'त्याचा मालक आता....'

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Santosh Deshmukh's dog Raju : संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हाच नाही, तर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवत देशमुख कुटुंबाला पाठिंबा दिला. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक जण लढा देत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटून गेले आहेत. असे असतानाही या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरारच आहे. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी यासह नऊ मागण्या देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र या मागण्या मान्य होण्यास विलंब होत असल्याने आजपासून देशमुख कुटुंबीय आणि मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान या लढ्यात संतोष देशमुख यांचा लाडका राजू हा कुत्रा देखील सहभागी असल्याचं दिसत आहे. गेल्या 70 दिवसांपासून देशमुखांच्या घराबाहेरील संतोष देशमुख यांच्या फोटोजवळ राजू तासन् तास बसलेला असतो. राजू कधी घराच्या दारात बसतो तर कधी या संतोष देशमुखांच्या फोटोजवळ.  अशा दोनच ठिकाणी गेले 70 दिवस त्याचे वास्तव्य आहे.  

Farmer Family : शेतकरी कुटुंबात स्थळ सांगून येईना; मराठवाड्यातील 30 वर्षांच्या तरुणाने शेतातच संपवलं जीवन

नक्की वाचा - Farmer Family : शेतकरी कुटुंबात स्थळ सांगून येईना; मराठवाड्यातील 30 वर्षांच्या तरुणाने शेतातच संपवलं जीवन

याबाबत धनंजय देशमुख यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, संतोष देशमुख यांचा राजुवर खूप जीव होता. त्यामुळेच तो त्यांची वाट पाहत फोटोजवळ बसून असतो. संतोष देशमुख परत येतील अशा आशेने आजही राजू फोटोजवळ बसून असतो.

Latest and Breaking News on NDTV

आपण एकमेकांना सांगू शकतो, बोलू शकतो परंतु आता राजूला कसं सांगणार त्याचा मालक या जगात नाही, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: