जाहिरात

Beed News : वाल्मीक कराडला दिलासा नाही; दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Walmik Karad: सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. उज्वल निकम यावर बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराडसह इतर आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल करून फक्त वेळेचा अपव्यय केला आहे.

Beed News : वाल्मीक कराडला दिलासा नाही; दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

आकाश सावंत, बीड

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे खटल्याला गती मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयावर दोन्ही पक्षांचे वकील ॲड. विकास खाडे व विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले उज्वल निकम?

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. उज्वल निकम यावर बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराडसह इतर आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल करून फक्त वेळेचा अपव्यय केला आहे. विष्णू चाटे आणि इतर आरोपींचेही अर्ज आले आहेत. आम्ही त्यावर जोरदार युक्तिवाद मांडला आहे. संपत्ती जप्तीवरील निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, या खटल्याला विलंब लागेल असं समजणं चुकीचं आहे. खटला तातडीने सुरु होणार आहे.

(Ajit Pawar Birthday: 11 एकरात भव्य फार्म आर्ट, माणिकराव कोकाटेंकडून अजित पवारांना अनोखे बर्थडे गिफ्ट)

काय म्हणाले आरोपीचे वकील?

आरोपीचे वकील ॲड. विकास खाडे यांनी म्हणालं की, वाल्मीक कराड याने दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. आम्ही आता वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत असून लवकरच हा आदेश आम्ही चॅलेंज करू. याशिवाय, आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनी सुद्धा दोषमुक्तीसाठी अर्ज केले आहेत.

(Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे राजीनामा देणार? अजित पवारांवर कारवाईसाठी दबाव)

कधी होणार सुनवणी

दरम्यान, चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद अद्याप झाला नसून इतर आरोपींच्या अर्जामुळे ड्राफ्ट चार्जही रेकॉर्डवर आलेला नाही. संपत्ती जप्तीच्या अर्जावर तसेच अकाउंटवरील निर्बंध उठवण्यासाठी झालेल्या अर्जांवर आता 4 ऑगस्ट रोजी न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com