जाहिरात

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीड पोलीस चौकशीच्या फेऱ्यात; न्यायालयीन समितीची नियुक्ती

विशेष म्हणजे या समितीच्या चौकशी फेऱ्यात आता बीड पोलिसही आले आहेत. हे प्रकरण बीड पोलिसांनी कशी प्रकारे हाताळले याची चौकशी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे. 

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीड पोलीस चौकशीच्या फेऱ्यात; न्यायालयीन समितीची नियुक्ती

Santosh Deshmukh Murder Case:  राज्यभरात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. एल. ताहलियानी यांची एकसदस्यीय चौकशी समिती शासनाने नियुक्त केली आहे. विशेष म्हणजे या समितीच्या चौकशी फेऱ्यात आता बीड पोलिसही आले आहेत. हे प्रकरण बीड पोलिसांनी कशी प्रकारे हाताळले याची चौकशी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

न्यायालयीन चौकशीत काय तपासले जाणार?

  1. संपूर्ण घटनाक्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास केला जाणार
  2. या घटनेसाठी कोणती व्यक्ती, संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार होती याची तपासणी केली जाऊ शकते
  3. कायदा, सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचे नियोजन योग्य होते का, परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का? याचा आढावा
  4. जबाबदारी निश्चित करणे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाय सूचवणे या मुद्द्यांवर समिती चौकशी करणार
  5. न्यायालयीन समितीला कोणत्याही जागेत, इमारतीत प्रवेश, कुणालाही चौकशीला बोलावणे, कोणतेही कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार

       6. बीड हे या चौकशी समितीचे मुख्यालय असेल.

(नक्की वाचा- Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण)

 दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले,सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.  यासह प्रतीक घुले, महेश केदार,जयराम चाटे याची 12 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने या सर्वांना बीड येथील जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.आता ला न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच वाल्मीक कराड,विष्णू चाटे याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आधीच सरकारी वकील जे. बी.शिंदे यांच्या माध्यमातून सीआयडीने याची उत्तर दाखल केले आहे. वाल्मीक करण्याच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा विरोध आहे.त्यातच विष्णू चाटे याच्या खडणी प्रकरणावर देखील केज न्यायालयात सुनावणी होणार आहे आता या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(नक्की वाचा- Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com