
सुजीत आंबेकर, सातारा
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून साताऱ्यात पालमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले एकमेकांसमोर आले आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सातारामध्ये डॉल्बी वाजणार आणि ती पहाटेपर्यंत वाजणार, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. उदयनराजेंच्या या भूमिकेबाबत बोलताना शंभूराजे देसाई म्हटलं की, राज्यातील नियम आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांबाबत त्यांना दिली जाईल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदयनराजे यांनी काय म्हटलं होतं?
पोलीस अधीक्षकांसोबत माझं बोलणं झालं आहे. वर्षातून एकदा हा सण येत असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात असतात. या मिरवणुकीत काही गुन्हे घडत नाहीत. न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 12 वाजेपर्यंत डॉल्बी वाजण्यास परवानगी आहे. मग मिरवणूक रात्री 12 वाजता थांबवायची आणि पुन्हा सकाळी सुरु करायची याला काय अर्थ आहे. त्यामुळे सलग मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.
(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर)
पोलिसांचं बळ देखील कमी आहे. आपलं काही यूपी-बिहार नाही, तसं असतं तर मी पोलीस अधीक्षकांना फोन देखील केला नसता. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. आपणही पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. पोलिसांनी सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे.पोलिसांकडून अतिरेक झाला तर लोक मी सांगितलं तरी ऐकणार नाहीत, असा इशाराच उदयनराजे यांनी दिला. विसर्जन मिरवणुकीसाठी कितीपर्यंत वेळ आहे माहित नाही. मात्र आमच्या मिरवणुकीची वेळ काय ते ठरवणार का? तेव्हा बघू काय बघायचं ते, असं उदयनराजे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड)
उदयनराजे काय म्हणाले होते?
उदयनराजे काय बोलले आम्ही तपासून घेऊ. उच्च न्यायालयाचे निर्देश काय आहे, सध्याची प्रचलित पद्धत, राज्यातील नियम काय आहे याची माहिती खासदार उदयनराजेंना दिली जाईल. कुणीही नियमांचा, कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आरोग्याला जे काही अपायकारक आहे ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world