
मुंबई: इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती केल्याने राज्यात नवा वादंग निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात हेच बघू असा इशाराही मनसेने दिला आहे. मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्व साधारण हिंदी भाषेसह भारतीय भाषांचे पर्याय असलेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sharad Pawar: 'हिंदीची सक्ती नको, पण....', शरद पवार यांचे मोठे विधान
त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम असून इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्व साधारण हिंदी भाषेसह वेळापत्रकात तृतीय भाषा म्हणून इतर भारतीय भाषांच्या पर्यायासह वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तिसरी भाषा शिकण्यासाठी कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षणाचे तास कमी करण्यात आले आहेत. तर मागील वेळापत्रकातील 45 आणि 60 मिनिटाची तासिका सुद्धा 35 मिनिटाची करण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शासन निर्णय जाहीर होताच दुसऱ्या दिवशी केले इयत्ता पहिलीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तिसऱ्या भाषेसाठी अद्याप पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिलेली नाही, शिक्षकही नाहीत, तर मग वेळापत्रकाची घाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी माध्यमांच्या शाळांचे वेळापत्रक तयार करत असताना प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा इंग्रजी, तृतीय भाषा हिंदी किंवा त्याला पर्याय म्हणून इतर भारतीय भाषा, गणित,कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांचा समावेश असेल.
Amit Shah : देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल, अमित शाह असं का म्हणाले?
तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रथम भाषा इंग्रजी द्वितीय भाषा मराठी तृतीय भाषा सर्वसाधारणपणे हिंदी किंवा इतर भारतीय भाषा,गणित,कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांचा समावेश असेल. हे वेळापत्रक इयत्ता पहिलीसाठी लागू होईल, तरी दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके आल्यानंतर हे वेळापत्रक लागू होणार आहे. तिसरी भाषा शिकवण्यासाठी वर्षभरात 103 तास शिकवले जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world