Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार

Jalgaon News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील शरद पवारांच्या शिलेदारांनी शरद पवारांची साथ सोडल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, सोलापूर

Jalgaon News : जळगावमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे दोन शिलेदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील माजी आमदार कैलास पाटील, दिलीप वाघ व दिलीप सोनवणे यांच्यासह शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सदस्या तीलोत्तमा पाटील व अन्य प्रमुख पदाधिकारी देखील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील शरद पवारांच्या शिलेदारांनी शरद पवारांची साथ सोडल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेशाच्या निर्णयाच्या काही दिवस आधीच गुलाबराव देवकर व सतीश पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. 

(नक्की वाचा- Pehalgam Terror Attack: 'PM मोदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर, जाता जाता पाकचे 4 तुकडे...' 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!)

या विवाह सोहळ्यानिमित्त तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या या चर्चेनंतर दोन्हीही माजी मंत्र्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Jalgaon News : 'गुलाबराव' महायुतीची डोकेदुखी वाढवणार? जळगावचं राजकारण बदलणार?)

गुलाबराव पाटलांची टीका

गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्याचा अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय गुलाबराव पाटलांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. गुलाबराव देवकरांनी जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला असला तरी मात्र त्यांचे घोटाळे हे लपणार नसून ते घोटाळे लपवण्यासाठीच अजित पवारांसोबत जात असल्याचा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे. तर एकीकडे माणसं तपासून पक्षात घेत असल्याचे अजित पवार छाती ठोकपणे म्हणत असले तरी देवकरांसारखी चांगली माणसं  त्यांनी तपासली असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांनाही लगावला आहे. 

पाहा व्हिडीओ

Topics mentioned in this article