
पैठण विधानसभेचे माजी आमदार व औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या सुनेच्या व बायकोच्या नावावर सरकारी दारू दुकानांचे लायसन्स प्राप्त केल्याचे आरोप करून भुमरे यांच्या नातेवाईकांच्या नावाने भुमरे मंत्री असताना देण्यात आलेल्या दारू परवान्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी करावी अशी कायदेशीर नोटीस दत्तात्रय गोरडे यांनी अॅड असीम सरोदे यांच्या तर्फे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिली आहे.
नक्की वाचा - Exclusive : अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांना इशारा, Video
पैठण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोरडे यांनी नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, भुमरे कुटुंबीयांच्या नावावर वेगवेगळे दारू दुकानांचे परवाने आहेत. संदिपान भुमरे यांनी मंत्री असल्याचा गैरफायदा उचलून राज्याच्या दारूवरील कर धोरणात बदल केला व स्वतःकडे असलेले FL-2 वाइन शॉप दारू परवाने वगळता इतर FL-3 परमिट रूम परवान्यांवर 10% VAT कर ची वाढ केली, ज्याने त्यांना अवैधरित्या लाभ करून घेतला. तसेच निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील माहितीनुसार संदीपान भुमरे, पत्नी पुष्पा भुमरे, त्यांचा मुलगा विलास (बाप्पू) भामरे व सून वर्षा भुमरे यांच्या संपत्तीत अनपेक्षित वाढ झाल्याचे दिसते असे निरीक्षण नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून लोकशाहीस काळीमा फासणारी असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अॅड असीम सरोदे यांनी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदर दारू घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित गुन्हा नोंदवून संदीपान भुमरे आणि त्यांच्या दारू परवाना धारक सगळ्या नाईवाईकांची ईडीमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात संदीपान भुमरे व संबंधित नातेवाईकांची चौकशी करण्यात आलेली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असे दत्तात्रय गोरडे म्हणाले. अॅड असीम सरोदे, अॅड.प्रतीक तलवार, अॅड श्रीया आवले व अॅड. बाळकृष्ण निढाळकर म्हणाले की दारू परवाने देणे, मिळवून देणे याचे एक मोठे रॅकेट उघड होईल इतकी माहिती जमा करण्यात आलेली आहे. दारूची दुकाने, परमिट रुम, बार कुठे सुरु करावेत याबाबत वेळोवेळी सोयीनुसार नियम बदलण्याची गुन्हेगारी संदीपान भुमरे यांच्या प्रकरणातून बाहेर येऊ शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world