जाहिरात

Shirdi News : साई संस्थानचं नवीन देणगीदार धोरण जाहीर, भाविकांना काय लाभ मिळणार?

Shirdi news : भाविकांनी दान देते वेळी कुटुंबातील जास्तीत जास्त 5 सदस्यांची नावे नोंदवता येणार असून त्याच भाविकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

Shirdi News : साई संस्थानचं नवीन देणगीदार धोरण जाहीर, भाविकांना काय लाभ मिळणार?

सुनील दवंगे, शिर्डी

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांना देणगी देणाऱ्या भाविकांसाठी आता साई संस्थानने नवीन देणगी धोरण आणलं आहे. पूर्वी 25000 हजार देणगी देणाऱ्या भाविकांपासून सुरु होणारी व्हीआयपी योजनेची रक्कम कमी करत 10000 रुपयांवर आणली आहे. सहा भागात देणगी धोरण साई संस्थानने सुरु केलं आहे. यात टप्प्यांनुसार विभागणी करत देणगीदार भाविकांना व्हीआयपी सुविधा मिळणार असल्याचं साई संस्थानच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कसं आहे नवीन देणगीदार धोरण?

10 ते 25 हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना एक व्हीआयपी आरती असणार आहे. तर 25 हजार ते 50 हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती एक दर्शन असणार आहे. 50 हजार ते एक लाख रुपये देणगी दिल्यास दोन प्रोटोकॉल आरती दिली जाणार आहे. 

(नक्की वाचा-  अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोड, देवस्थान समितीचं भाविकांना आवाहन)

एक लाख ते 10 लाख देणगी देणाऱ्या भाविकांना प्रथम वर्षी दोन प्रोटोकॉल आरती तर पुढील प्रति वर्षी एक प्रोटोकॉल आरती आणि वर्षातून एकदा तहयात व्हीआयपी दर्शन साई संस्थानकडून दिले जाणार आहे. 10 लाख ते 50 लाख रुपये देणगी दिल्यास आता प्रति वर्षी दोन प्रोटोकॉल आरती, वर्षातून एक वेळेस तहयात व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन आणि साईबाबांना आरतीच्या वेळेस परिधान केले जाणारे वस्त्र चढवता येणार आहेत. 

50 लाखांपेक्षा अधिक देणगी दिल्यास आता प्रति वर्षी 3 प्रोटोकॉल आरती, वर्षातून दोन वेळेस तहयात व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन आणि साईबाबांना आरतीच्या वेळेस परिधान केले जाणारे वस्त्र चढवता येणार असल्याचं साई संस्थानकडून जाहीर करण्यात आलं आहे.

(नक्की वाचा- Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?)

या काळात सुविधेचा लाभ मिळणार नाही

साईबाबा संस्थानने आज व्हीआयपी देणगीदार धोरणाची अधिकृत घोषणा केली आहे. यात भाविकांनी दान देते वेळी कुटुंबातील जास्तीत जास्त 5 सदस्यांची नावे नोंदवता येणार असून त्याच भाविकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. दान दिल्यानंतर संबधित भाविकांना प्रत्यक्ष तसेच SMS द्वारे सुविधेबाबत वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत साजरे होणारे गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी, रामनवमी तसेच अति गर्दीच्या काळात या धोरणातील सुविधा दिल्या जाणार नसल्याचं देखील साई संस्थानने स्पष्ट केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com