जाहिरात

Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी

Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी
मुंबई:

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ 2 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता या मर्यादेत वाढ करून शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्याकरिता 648 कोटी 15 लाख 41 हजार रुपयांच्या निधी वितरणाला तातडीने मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मुंबईत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.

नक्की वाचा: 750 किलो कांद्याला मिळाला फक्त 664 रुपयांचा भाव; पावसाने शेत तुडवलं, शेतकऱ्याला रडवलं

मदत वितरणाबद्दलचा निर्णयही काढला

या निर्णयामुळे राज्यातील एकूण 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेल्या 6,12,177 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांसाठी 2 हेक्टरपर्यंतची मदत मंजूर झाली होती, आता अतिरिक्त 1 हेक्टरसाठी ही वाढीव मदत दिली जाईल. या मदतीच्या वितरणासंबंधीचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत सुमारे 8139 कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित केले आहेत.

नक्की वाचा: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर

विभागनिहाय मदतीचा तपशील जारी

विभागनिहाय मदत वितरणाचा तपशील देताना मकरंद जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले की, छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील 3,58,612 शेतकऱ्यांच्या 3,88,101.13 हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपये वितरित केले जातील. नागपूर विभागासाठी 7 कोटी 51 लाख 75 हजार रुपये, नाशिक विभागासाठी 59 कोटी 36 लाख 13 हजार रुपये, अमरावती विभागासाठी 131 कोटी 56 लाख 47 हजार रुपये आणि पुणे विभागासाठी 103 कोटी 37 लाख 20 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या 25.33 हेक्टर क्षेत्रासाठी 2 लाख 16 हजार रुपयांची मदत देखील यात समाविष्ट आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com