सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी अनेक तर्क लावले जात आहे. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अनेक थिएरी पुढे येत आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तरुणीची हॉटेलमध्ये बोलावून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील अनेक त्रुटी आणि संशयास्पद बाबींवर बोट ठेवले आहे. डॉक्टर तरुणीची हॉटेलमध्ये बोलावून हत्या करण्यात आली असावी, असा आमचा दाट संशय आहे. या प्रकरणात फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघेच नाहीत, तर यात आणखी कुणी आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.
(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)
हस्ताक्षरात तफावत
मृत तरुणी आपल्या बहिणीला पुढील आठ दिवसांच्या कामाचे, म्हणजेच जातीच्या दाखल्याच्या व्हेरिफिकेशनचे नियोजन सांगत होती. पुढच्या कामांचे नियोजन करणारी तरुणी अचानक आत्महत्या कशी करेल? याशिवाय तरुणीच्य हातावर आढळलेली सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिचे नसल्याचा दावा तिच्या बहिणीने केला आहे. जी तरुणी चार पानांचा पत्र लिहून शकते ती हातावर चार ओळी लिहून जीव का देईल? तिची सुसाईड नोट गायब केली का? याची देखील तपासणी व्हायला हवी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्याचं हॉटेल
गावात घर असताना डॉक्टर तरुणी हॉटेलवर कशी गेली. रात्री 1 वाजता तरुणीला हॉटेलवर एन्ट्री कशी दिली. हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. हा भोसले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा निकटवर्तीय आणि भाजपचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्यामुळे तरुणी हॉटेलवर गेली होती की तिला बोलावलं होतं. बोलावलं असेल तर कुणी आणि का बोलावलं? याचा तपास झाला पाहिजे.
(नक्की वाचा- Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख)
हॉटेलमधून बॉडी उचलण्याची घाई
डॉक्टर तरुणीचा मृतदेह हॉटेलमधून ताब्यात घेताना झालेल्या घाईवरही अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हॉटेलमधून डॉक्टरांचा मृतदेह उचलण्याची घाई का केली गेली? मृतदेहाची ओळख पटल्यावर तिचे कुटुंबीय येईपर्यंत पोलीस प्रशासनाने वाट का पाहिली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चौकशीच्या फेऱ्यात आले पाहिजेत. तसेच, त्यांचे दोन्ही पीए, तत्कालीन डीवायएसपी, पीआय महाडिक, एपीआय जायपत्रे, आणि पीएसआय पाटील यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world