
विशाल पुजारी, कोल्हापूर
Kolhapur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही. शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते समजले जाणारे हर्षल सुर्वे यांनी आज आज आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवेसना जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना ठाकरे गटातील आणखी काही कार्यकर्ते सुद्धा नाराजी व्यक्त करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(नक्की वाचा- "5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार", राज ठाकरे यांची घोषणा)
नुकतीच शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाची यादी जाहीर करण्यात आली. यादीमध्ये कोल्हापूरसाठी रविकिरण इंगवले यांचे नाव जिल्हाप्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं होतं. यामुळे माजी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी नाराजीचे सूर व्यक्त केले. त्यांच्या या नाराजी नाट्यानंतर आणखी काही कार्यकर्ते सुद्धा इंगवले यांच्या नियुक्तीमुळे खदखद व्यक्त करत आहेत.
अखेर आज हर्षल सुर्वे यांनी आपल्या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा शिवसेना सचिव विनायक राऊत यांना व्हाट्सअपद्वारे पत्र पाठवला आहे. या पत्रातून त्यांनी आपण नाराज का आहे याबाबत सांगितला आहे. हर्षल सुर्वे यांच्या राजीनाम्यामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटात आणखी काय घडामोडी होणार याकडे लक्ष असणार आहे.
(नक्की वाचा- वडिलांचा 70 वर्षांचा वारसा सोडणार, राहुल गांधींचे निकटवर्तीय कुणाल पाटलांचा पक्षाला राम राम; उद्या भाजपमध्ये प्रवेश)
हर्षल सुर्वे यांनी पत्रात काय लिहिले?
शिवसेना ठाकरे गटातू बाहेर पडताना हर्षल सुर्वे यांनी लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, "साहेब माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघून जा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासद पदाचा राजीनामा देत आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world