जाहिरात

भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, विमानाचा थरारक Video आला समोर

Uttar Pradesh Farrukhabad Plane Crash Video :  उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथे विमान दुर्घटना झाल्यानं खळबळ उडाली आहे.फर्रुखाबाद येथे एक खासगी विमान धावपट्टीवरून स्लिप होऊन थेट झाडीत घुसलं.

भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, विमानाचा थरारक Video आला समोर
Uttar Pradesh Farrukhabad Plane Crash Video
मुंबई:

Uttar Pradesh Farrukhabad Plane Crash Video :  उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथे विमान दुर्घटना झाल्यानं खळबळ उडाली आहे.फर्रुखाबाद येथे एक खासगी विमान धावपट्टीवरून स्लिप होऊन थेट झाडीत घुसलं. सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.प्लेन रनवेवर टेकऑफ करण्यासाठी सुसाट धावलं होतं, पण अचानक प्लेनची चाके सरकली अन् विमान थेट झाडीत कोसळलं. ही घटना फर्रुखाबादच्या मोहम्मदाबाद विमानतळावर घडली. हे खासगी विमान भोपाळसाठी उड्डाण घेण्यासाठी सज्ज होतं. परंतु, विमानाच्या टायरमध्ये हवा कमी असल्याने हे विमान रनवेवरच स्लिप झालं, असं सांगितलं जात आहे. स्थानिक फॅक्ट्रीत काम करणारे काही अधिकारी या विमानाने प्रवास करत होते, अशीही माहिती समोर आली आहे. या विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ एएनआयने एक्सवर शेअर केला आहे.

भोपाळला जाणाऱ्या विमानाचा अपघात कसा घडला?

मोहम्मदाबादच्या या विमानतळावर बुधवारी 8 ऑक्टोबरला खिमसेपूर औद्योगिक क्षेत्रात बनणाऱ्या बीअर फॅक्ट्रीचे डीएमडी अजय अरोरा, एसबीआय हेड सुमित शर्मा,बीपीओ राकेश टीकू फॅक्ट्रीच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी भोपाळहून आले होते. हे सर्व अधिकारी जेट सर्व्हिस एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेच्या खासगी विमानाने सकाळी साडेवाजता पुन्हा भोपाळला रवाना होण्यासाठी निघाले होते. प्लेन रनवेवर टेक ऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमान झाडीत कोसळलं.

नक्की वाचा >> गोंडस बाळ आईची वाट पाहत होतं, ड्युटी करून आई घरी परतली अन् बाळानं असं काही केलं..Video पाहून डोळे पाणावतील!

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात वुडपॅकर ग्रीन एंग्री न्यूटी प्रायव्हेट लिमिटेड डीएमडी अजय अरोरा, एसबीआय हेड सुमित शर्मा, बीपीओ राकेश टीकूसह कॅप्टन नसीब बामल, कॅप्टन प्रतीक फर्नांडीज प्रवास करत होते. रनवेवर जवळपास 400 मीटरपर्यंत विमानाने धाव घेतली होती. त्यानंतर हा अपघात घडला. कंपनीचे उत्तरप्रदेशचे प्रोजेक्ट हेड मनीष कुमार पांडे यांनी म्हटलं की, सकाळी साडेदहा वाजता ते विमानाने भोपाळला जाणार होते. विमानाच्या चाकात हवा कमी असल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.

#WATCH | Uttar Pradesh: A private aircraft lost control while taking off from the runway in Farrukhabad and collapsed in bushes nearby. The two pilots and passengers are safe.

(Video Source: Police) pic.twitter.com/pWlZOl3rmG

— ANI (@ANI) October 9, 2025

पांडे यांनी आरोप केला आहे की, पायलटच्या बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना झाली असती.पायलटला आधीच माहित होतं की टायरमध्ये हवा कमी होती. उत्तर प्रदेश प्रोजेक्ट हेड मॅनेजर मनीष कुमार पांडे यांनी म्हटलंय की,विमान येथून भोपाळला जाणार होतं.कंपनीसाठी विजय अरोरा यांनी म्हटलं की,आता ते आग्राहून विमानाने भोपाळला जाणार.

नक्की वाचा >> वाह रे वाह! Google मध्ये नोकरी मिळाली, पोरानं आईला थेट अमेरिकेला नेलं अन् ऑफिसमध्ये..हृदयस्पर्शी Video पाहाच

फायर ब्रिगेडने म्हटलंय की, त्यांना 12 तासांपूर्वी माहिती देण्यात आली नव्हती. तसच ट्रेजरी फी सुद्धा जमा करण्यात आली नव्हती. लँडिगबाबतची सूचना अर्धातास आधी देण्यात आली होती. तर टेकऑफची सूचना जवळपास 25 मिनिटांपूर्वी दिली होती. घटनास्थळी फायर ब्रिगेडचे आशीष वर्मा, डीएसपी अजय वर्मा, एसडीएम सदर रजनीकांत, अपर उप जिल्हाधिकारी रवींद्र कुमार, यांच्यासह संजय कुमार उपस्थित होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com