गुरु दळवी, सिंधुदुर्ग:
Sindhudurg Court News: सावंतवाडी येथील अपघातप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकसान भरपाई अदा न केल्याने मोटर अपघात वाद न्यायाधिकरण, सिंधुदुर्ग यांनी एसपी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील आसन व टेबल आदी साहित्य जप्त करण्याचे आदेश केले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत ही भरपाई भरणा न केल्यास जप्तीचे - वॉरंट पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अर्जदार विजय बापू वेंगुर्लेकर यांच्यावतीने काम पाहणारे अॅड. दीपक अंधारी यांनी दिली आहे.
अॅड. अंधारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथे मोती तलावानजीक २०१६ मध्ये मोटरसायकल व पोलीस बोलेरो जीप यांच्यात अपघात झाला होता, अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेले विजय बापू वेंगुर्लेकर (रा. तेंडोली- कुडाळ) हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर घटनास्थळ रस्ता, नगरपालिकेच्या पाण्याच्या बंबाने धुण्यात आला होता. त्यामुळे घटनास्थळावर पडलेले रक्त, टायरच्या खुणा आदींचा पुरावा नष्ट झाला होता.
Srinagar Blast: श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट! 7 मृत्यू, 27 जखमी, हादरवणारा VIDEO
या कृत्यामुळे पोलीस जीप चालक प्रशांत धुमाळ याच्याविरुद्ध ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. अपघातामुळे वेंगुर्लेकर यांना कायमचे अपंगत्व येऊन ते अंथरुणावर खिळले गेले. विजय वेंगुर्लेकर यांच्यातर्फे मोटर अपघात वाद न्यायाधिकरण सिंधुदुर्ग येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. त्या कामी न्यायाधिकरणाने मोटारसायकलची विमा कंपनी तसेच पोलीस जीपचे मालक तथा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून संगुक्तरित्गा रक्कम १४ लाख ९७ हजार २७० रुपये वसुलीबाबत आदेश दिले होते.
या रकमेपैकी जवळपास निम्मे रक्कम विमा कंपनीने न्यायाधिकरणाकडे भरणा केली. परंतु एसपी सिंधुदुर्ग यांच्यावतीने नोटीस प्राप्त होऊनही कोणतीही रक्कम भरणा करण्याची तजवीज केली गेली नाही. या खटल्यात सामनेवाले क्र. असलेले पोलीस अधीक्षक हे सामनेवाले क्र. ४ असलेले प्रशांत धुमाळ यांचे वरिष्ठ आहेत. मात्र, त्यांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधीने न्यायालयात हजर राहण्यास व रक्कम भरण्यास टाळाटाळ रक्कम केली.
त्यामुळे मोटर अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एच. बी. गायकवाड यांनी ७ लाख ५४ हजार ३५१ रुपये वसुली प्रकरणी, एसपी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील आसन व टेबल इत्यादी साहित्य जप्त करण्याचे आदेश केले आहेत. ही रक्कम १५ नोव्हेंबरपूर्वी भरणा न केल्यास जप्ती वॉरंट पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. दीपक अंधारी यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world