Sindhudurg News : आखाती देश अन् अमेरिका, इस्राइल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज कंपनीमार्फत एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची आवक होत आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. त्यामुळे एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे.
गॅस सिलिडरचे बुकिंग करताना OTP बुकिंग ऐवजी IOCL/BPCL/HPCL या कंपनीमार्फत दिलेल्या नवीन अॅपद्वारे बुकिंग करावे. बुकिंग केल्यानंतर तत्काळ गॅस सिलिंडर मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तसेच गॅस बुकिंगसाठी कंपनीने बदलेल्या प्रक्रियेनुसार शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवस गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जाईल. याची नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. याबाबत काही अडचणी उद्भवल्यास हेल्पलाईन क्र. 02362-228847 /1077, मोबाइल क्र. 7498067835 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा तत्काळ संबंधित तालुक्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.
सर्व तालुक्यातील तक्रार निवारणासाठी नियुक्त केलेले अधिकारी/ कर्मचारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे
1 देवगड - संग्राम गुट्टे - 8010376746
सुनील बेबले - 9222106318
2 कणकवली - नितीन डाके - 7020717934
रती घोडके - 8793595506
3 वेंगुर्ला - विजय पवार - 9923693779
तृप्ती गडकर - 7507910823
4 सावंतवाडी - दिपाली वाघमारे - 7798792616
कमलेश ठाकूर - 9423587813
5 मालवण - शीला निकस - 8888113923
विशाल कापसे - 8888269729
6 कुडाळ - विजय पवार - 9923693779
शिवानी पाटील - 8390625676
7 वैभववाडी - सीमा गायकवाड - 8329957225
रामेश्वर दांडगे - 8830303509
8 दोडामार्ग - संजय मद्रे(प्र.) - 8983663466
कृष्णा वेंगुर्लेकर - 9158326010
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world