जाहिरात

Solapur News: मुलासाठी डायपर आणायला गेला तो परतलाच नाही! रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह

Solapur News: सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात एका 24 वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुफियान गुलाम रसूल शेख असे या मृत तरुणाचे नाव

Solapur News: मुलासाठी डायपर आणायला गेला तो परतलाच नाही! रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह

सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दीड वर्षांच्या मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पद आणि रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे विजापूर रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुफियान गुलाम रसूल शेख असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. 

डायपर आणण्याचे सांगून घराबाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान याचा विवाह अवघ्या दीड वर्षांपूर्वी झाला होता आणि त्याला एक लहान मुलगा आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तो आपल्या लहान मुलासाठी बाजारातून डायपर आणतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती.

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रात्रीच्या सुमारास विजापूर रोड परिसरातील 'पनाश अपार्टमेंट'चे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते. यावेळी अपार्टमेंटच्या परिसरात त्यांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी विनाविलंब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली.

पोलिसांनी उचलला फोन, अन्

सुफियान वेळेत घरी न आल्यामुळे काळजीपोटी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर सतत फोन फिरवत होते. घटनास्थळी तपास करत असताना पोलिसांनी सुफियानच्या वाजणाऱ्या फोनचे कॉल उचलले आणि त्याच्या कुटुंबीयांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली. पोलिसांकडून ही बातमी ऐकताच कुटुंबात एकच चीख-पुकार आणि आक्रोश सुरू झाला.

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

हत्या की आत्महत्या? 

घरून केवळ डायपर आणण्यासाठी निघालेला सुफियान या ठिकाणी नेमका का आणि कसा गेला? त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला? त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली की पूर्ववैमनस्यातून किंवा इतर कारणाने त्याची हत्या करण्यात आली आहे? या सर्व अनुत्तरीत प्रश्नांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com