Solapur News: सोलापूर शहरामध्ये कौटुंबिक वादातून आणि अपमानाच्या भावनेतून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आणि तिच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्यामुळे एका 38 वर्षीय पतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या पतीने आपल्या पत्नीच्या नावे एक 6 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, हा व्हिडिओ आता समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव जाकीर अब्दुल रज्जाक पटेल असे आहे.
राहत्या घरात फॅनला घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. जाकीर पटेल हे सोलापूर येथील आपल्या राहत्या घरात असताना, त्यांनी घरात कोणी नसताना छताच्या सिलिंग फॅनला कापडाच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यांनी जाकीर यांना तातडीने खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
आत्महत्येपूर्वी बनवला 6 मिनिटांचा व्हिडिओ
जाकीर पटेल यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक 6 मिनिटांचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ त्यांनी विशेषतः आपल्या पत्नीला उद्देशून तयार केला होता. जाकीर यांच्या मृत्यूनंतर हा धक्कादायक व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांसमोर आणला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आणि परिस्थिती स्पष्ट केल्याचे समजते.
नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, जाकीर यांच्या पत्नीचे अन्य एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. या अनैतिक संबंधांविषयी जेव्हा जाकीर यांना समजले, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला याबद्दल जाब विचारला. यावरून पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरात मोठे वाद आणि भांडणे होत होती. पत्नीचे ज्या व्यक्तीसोबत संबंध होते, त्या व्यक्तीने जाकीर पटेल यांना गाठून चापट मारली होती आणि त्यांना गंभीर धमक्या दिल्या होत्या.
(नक्की वाचा- Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती)
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जाकीर यांचा मोबाईल फोन आणि तो 6 मिनिटांचा सुसाईड व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतला आहे. या व्हिडिओची तांत्रिक तपासणी केली जात असून, नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world