सौरभ वाघमारे, सोलापूर:
Solapur Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकानंतर काँग्रेस नेत्या तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. सोलापूरच्या खासदार भाजपसाठी काम करतात हे अख्ख्या जगाला कळून चुकलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाले सुजात आंबेडकर?
"वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजार आंबेडकर यांनी केलेल्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार आहेत. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तशी डील झाली आहे," असा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
PMC Election 2026: 'हाच का दादांचा वादा?' सभेआधी अजित पवारांना 3 बोचरे सवाल; बॅनरमुळे राजकारण तापलं
"ह्या निवडणुकीच्या आधीच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. ऑक्टोबरमध्येच त्या जाणार होत्या. मात्र त्यांना फडणवीसांनी थांबवले, तीन महत्वाच्या निवडणुका येतायत ,नगरपालिका,महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा," असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
काँग्रेसच्या नादाला लागू नका...
तसेच "तुम्हाला भाजपला पाडायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्यासमोर आहे. काँग्रेसच्या नादाला लागू नका, तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखं होते. हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेसबद्दल बोलत नसून तुमच्या सोलापूरबद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलं आहे," अशी टीकाही सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
Ajit Pawar News: '...म्हणून पुण्यातील रस्त्यांवर खड्डे', अजित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world