
सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Solapur To Goa flight service : सोलापूरकरांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. आता सोलापूर विमानतळावरुन थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे. येत्या 26 मे पासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार असून 16 मेपासून विमानसेवेची बुकिंग सुरू होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आठवड्यातून दोन दिवस सोलापूर-गोवा विमानसेवा असणार आहे. सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूरहून गोव्यासाठीचं विमान उड्डाण घेईल. 16 मेपासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल. गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी 7.20 मिनिटांनी विमान उडेल तर सोलापुरातून गोव्यासाठी 8:50 मिनिटाने विमान उडणार आहे. सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून लवकरच सोलापूरकरांना थेट गोव्याला जाता येणार आहे.
नक्की वाचा - Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव
सोलापूर ते गोवा यामधील अंतर जवळपास 400 किलोमीटर इतकं आहे. रस्ते मार्गाने गेलात तर यासाठी साधारण आठ तासांचा वेळ लागतो. मात्र विमानाने अवघ्या काही मिनिटात हा प्रवास करणं शक्य होणार आहे. सोलापूर ते गोवा यामधील अंतर जवळपास 400 किलोमीटर इतकं आहे. रस्ते मार्गाने गेलात तर यासाठी साधारण आठ तासांचा वेळ लागतो. मात्र विमानाने अवघ्या काही मिनिटात हा प्रवास करणं शक्य होणार आहे. सध्या सोलापूरहून गोव्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स बसची सुविधा आहे. बस ट्रॅव्हल्सचे तिकीट दर सर्वसाधारणपणे 1700 ते 2000 च्या घरात आहे. यासाठी सात ते आठ तास लागतात. मात्र विमानसेवा सुरू झाल्यामुळे बराच वेळ वाचणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world