जाहिरात
3 days ago

कॉमेडियन कुणाल कामराला दोन समन्स बजावूनही चौकशीसाठी गैरहजर राहिला. शिवसैनिक खार पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी 10 वाजता पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर टी सीरीजकडून कॉपीराईटचा दावा करण्यात आला आहे.  गुंडगिरी करणं थांबवा, कामराने ट्वीट करत उत्तर दिलं. 

पालघर केलवारोड येथे ज्वेलर्स दुकानात दरोडेखोरांचा गोळीबार

पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केळवारोड येथे  अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने परिसरात दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. केळवा रोड पूर्व भागात असलेल्या ममता ज्वेलर्स च्या दुकानात काही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिसरातील नागरिकांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी गोळीबार करत तेथून पळ काढला. दरम्यान या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

LIVE Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर... विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती....

1)माळेगांव सहकारी साखर कारखाना लि. शिवनगर, माळेगाव बु. येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नुतनीकरण अनावरण समारंभ व शेतकरी मेळावा ETA 10 AM 

2)भारत रंगराव तावरे यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत सांगवी येथील कर्मवीर विद्यालयात गरजू विद्यार्थी, विद्यार्थीनींना २५१ सायकलींचे वाटप... ETA 12:30 


3) इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर आयोजित दावत ए इफ्तार पार्टी... क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे राहणार उपस्थित

LIVE Update" त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला तीर्थक्षेत्र 'अ' वर्गाचा दर्जा जाहीर

मोठी बातमी - ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावरच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला तीर्थक्षेत्र अ वर्गाचा दर्जा जाहीर.. राज्याच्या नगरविकास विभागाने दिली मंजुरी.. या निर्णयामुळे त्र्यंबकचा विकास होण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग झाले मोकळे

Hinjewadi Fire: हिंजवडी जळीतकांड प्रकरण, आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

हिंजवडी जळीत कांड प्रकरण 

हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

जनार्दन हंबर्डीकर याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात केलं होतं हजर

LIVE Update: क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर ट्रॅप! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  परभणी जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाही केली आहे, जिल्ह्यातील मानवत येथील एका प्रकरणांमध्ये नगदी रक्कम स्वीकारताना घेतले ताब्यात.... पुढील कारवाईसाठी मोंढा पोलीस ठाण्यामध्ये नेले आहे...

Accident News: रुग्णवाहिका आणि प्रवासी ऑटोचा भीषण अपघात

हिंगोली शहरातून नांदेड कडे भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा आणि प्रवासी ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ  हा अपघात झालाय, या अपघातात रिक्षा मध्ये प्रवास करणारे सहा जण जखमी झाले आहेत तर रुग्णवाहिकेमधील रुग्णाला देखील गंभीर इजा झाली आहे, हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाताना या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे दरम्यान या अपघातातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नांदेड येथे हलवण्यात आले आहे

Live Update : पिंपरीतील बंद प्राणी संग्रहालयातील सर्पासाठी लाखों रुपयांचं उंदीर

पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 52  सापांसाठी 8 लाख 61 हजार 840 रुपयांचे पांढरे उंदीर खरेदी केले आहेत. प्रति उंदीर 159 रुपये दराने ही खरेदी करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हे उंदीर खाद्य म्हणून पुरविले जाणे असून  एक किंवा दोन उंदीर आठवड्यातून या सापांना खायला दिले जाणार आहेत. 

Live Update : अल्पवयीन मुलाला धमकावत घरफोडी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा परिसरात अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याची भीती दाखवून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर 2024 पासून 23 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमताने त्यांच्या 15 वर्षीय मुलाला लक्ष्य केले. 

Live Update : सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन - उद्धव ठाकरे

पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Live Update : मनसेचा गुढीपाडवा मेळावा 30 तारखेला शिवाजी पार्कात होणार

30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नये असं सांगितलं होतं. मनसेच्या सुरुवातीच्या काळात मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो पाहायला मिळत होते. मात्र बाळासाहेबांच्या सूचनेनंतर आतापर्यंत कोणीही बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर लावले नव्हते...

Live Update : चंद्रकांत पाटलांनी संजयकाका पाटील यांची घरी जाऊन घेतली भेट

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली मध्ये भाजपचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांची भेट घेतली आहे. संजयकाका पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घरी चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि संजयकाका पाटील यांच्या मध्ये भेट झाली, यावेळी संजयकाका पाटील यांची सुपुत्र प्रभाकर पाटील हे देखील उपस्थित होते.

Live Update : प्रशांत कोरटकरला श्वसनाचा त्रास

प्रशांत कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची माहिती 

वैद्यकीय तपासणी देखील झाली

यापूर्वीपासूनच कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची पोलिसांकडून माहिती 

कोरटकरच्या छातीत दुखल्याचीही सूत्रांकडून माहिती

Live Update : पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातच औषधांचा तुटवडा

पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातच औषधांचा तुटवडा 

गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा 

आरोग्य विभागाच्या औषध विभागात औषधांचा साठा कमी झाल्याने तुटवडा 

महापालिकेच्या एकूण  ६० पैकी अधिक रुग्णालयामध्ये १० हजार बाह्यरुग्णांना या औषधांचा उपयोग होत असतो

पण गेल्या काही दिवसांपासून औषध तुटवडा असल्याने रुग्णांना माराव्या लागत आहे चकरा 

महापालिकेकडून जादा औषध साठा देण्याची राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागणी

Live Update : शरद पवारांची आज पत्रकार परिषद

शरद पवारांची आज पत्रकार परिषद

आज सायंकाळी साडेचार वाजता दिल्लीत होणार पत्रकार परिषद

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बैठक दिल्लीत होणार आहे

या बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद होईल 

यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित असतील. 

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार यांचे नाव घेतले होते. त्यानंतर शरद पवार यांची पहिलीच पत्रकार परिषद असणार आहे.

Live Update : अखेर गौरव आहुजा याला जामीन मंजूर

अखेर गौरव आहुजा याला जामीन मंजूर 

येरवडा लघुशंका प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर 

पुणे सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तीवर गौरव आहुजाला जामीन करण्यात आला मंजूर 

पुण्यातील येरवडा परिसरात काही दिवसापूर्वी गौरव अहुजाने भर रस्त्यावर मद्यप्राशन करत लघुशंका करत असलेल्या व्हिडिओ झाला होता व्हायरल

याप्रकरणी दोन आरोपींना येरवडा प्रकरणी पुणे पोलिसांनी केली होती अटक 

त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाला आज जामीन मंजूर