जाहिरात

Parth & Jay Pawar : अजित पवारांच्या लेकांपैकी कोण होणार खासदार? भाजपने दिले मोठे संकेत

अजित पवार यांची मुलं जय पवार आणि पार्थ पवार यांना काय मिळणार याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Parth & Jay Pawar : अजित पवारांच्या लेकांपैकी कोण होणार खासदार? भाजपने दिले मोठे संकेत

Ajit Pawar death : सुनेत्रा अजित पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनानाच्या चौथ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. घाईघाईने शपथविधी घेण्यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची जागा कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान अजित पवार यांची मुलं जय पवार आणि पार्थ पवार यांना काय मिळणार याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पार्थ पवार यांना यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मोठं अपयश पाहावं लागलं. तर जय पवार अद्याप राजकारणात सक्रीय नव्हते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची जागा कोण चालवणार याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहे.

नक्की वाचा - Sunetra Pawar Net Worth: सुनेत्रा पवारांकडे 100 कोटींहून जास्त संपत्ती; हिरे,सोने आणि पुण्यात आलिशान फ्लॅट्स !

दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. जय पवार यांना राज्यसभा खासदारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांच्या बाबत भाजप अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र भाजपकडून जय पवार यांच्या नावावर सहमती दर्शण्यात आली आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com