जाहिरात

Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनाला 3 दिवस, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; वाचा इनसाइड स्टोरी

अजित पवार यांच्या निधनाच्या ६० तासात उत्तराधिकारी कोण होणार याच्या जलद हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनाला 3 दिवस, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; वाचा इनसाइड स्टोरी

Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी अपडेट समोर येत आहेत. अजित पवार यांच्या निधनाच्या ६० तासात उत्तराधिकारी कोण होणार याच्या जलद हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर राज्य शोकाकुल झाले असताना, सत्तेचा समतोल राखण्यासाठी पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव येत आहे ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचे. 

६० तासांत सत्तेची दिशा ठरवली?

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस बारामती शोकसागरात बुडाली आहे. रॅली, राजकीय हालचाली पूर्णपणे थांबल्या होत्या. शुक्रवारी अजित पवार यांच्या अस्थीविसर्जनासह महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाल होत असल्याचं दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे उद्या ३१ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

नक्की वाचा - Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोणा-कोणामध्ये झाली व्हिडिओ कॉलवर बातचीत..

शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी एका प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. ज्यात मुंबईतून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केली. या बैठकीत पहिल्यांदा औपचारिकपणे सुनेत्रा पवारांसमोर उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

न्यूज १८ हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदाचा होकार देण्यासाठी दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जर ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला दिली तर आमदार फुटीची आणि गटबाजीची शक्यता होती. 

शरद पवार गटाशी जवळीक साधणार? 

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील अंतर कमी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही आमदार साहेबांच्या नेतृत्व वापसीची इच्छा व्य़क्त करीत असल्याचं म्हटलं जात आहे. 

सरकार समोरील महत्त्वाचे प्रश्न...

१ उपमुख्यमंत्रिपद रिकामी
२ वित्त मंत्रालयाची जबाबदारी
३ आगामी निवडणुकीसाठी जागांची विभागणी
४ सत्ता संतुलन
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com