जाहिरात

MNS Candidate List Thane TMC Election 2026: ठाण्यात मनसेची पहिली यादी प्रसिद्ध झाली, 28 जणांना उमेदवारी मिळाली

MNS Candidate List Thane TMC Election 2026: या निवडणुकीसाठी मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्येही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने युती केली आहे.

MNS Candidate List Thane TMC Election 2026: ठाण्यात मनसेची पहिली यादी प्रसिद्ध झाली, 28 जणांना उमेदवारी मिळाली
MNS Candidate List Thane TMC Election 2026: मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.
ठाणे:

- रिझवान शेख, प्रतिनिधी

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये ठाणे महानगरपालिकेचाही समावेश आहे. (Thane Municipal Corporation Election 2026)  या निवडणुकीसाठी मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्येही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने युती केली आहे. (Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance For Thane) ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 जागा असून या ठिकाणी शिवसेना आणि भाजपने मुंबईप्रमाणे हातमिळवणी केली आहे. (Thane Municipal Corporation Election Shivsena BJP Alliance )

नक्की वाचा: मुंबईत युती आघाडीची स्थिती काय? 227 पैकी कोण किती जागा लढवणार? वाचा संपूर्ण आकडेवारी

ठाण्यात शिवसेना भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

ठाण्यामध्ये कोणी किती जागा लढायच्या यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा खल झाला होता. अखेर दोन्ही पक्षांनी युती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं, ज्यानंतर दोन्ही पक्ष किती जागा लढणार याचे चित्रही स्पष्ट झाले. ठाण्यामध्ये भाजप 40 जागांवर तर शिवसेना 87 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. विरोधकांचे बोलायचे झाल्यास काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आले असून यापैकी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मित्र पक्षाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची वाट न पाहाता, आपली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये एकूण 28 नावांचा समावेश आहे.

नक्की वाचा: KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने खातं उघडला, निवडणुकीआधीच 2 उमेदवारी विजयी 

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या 28 उमेदवारांची यादी पाहा

  1. प्रभाग क्र. 3  (क)    श्री. निलेश चव्हाण
  2. प्रभाग क्र . 2 (ड)    श्री. रविंद्र मोरे
  3. प्रभाग क्र. 4 (अ) - प्रतिक्षा हरेश्वर डाकी 
  4. प्रभाग क्र. 5 (ड)    श्री. पुष्कराज विचारे
  5. प्रभाग क्र. 20 (ब)    सौ. सविता चव्हाण
  6. प्रभाग क्र.  20 (क) सौ. राजश्री नाईक
  7. प्रभाग क्र. 14 (अ)    सौ. रेश्मा चौधरी
  8. प्रभाग क्र. 19 (ब)    सौ. प्रमिला मोरे
  9. प्रभाग क्र. 16 (ब)    सौ. आरती पाटील
  10. प्रभाग क्र. 8 (ड) श्री. सचिन कुरेल
  11. प्रभाग क्र. 15 (अ)    श्री. पवनकुमार पडवळ
  12. प्रभाग क्र. 16 (क)    सौ. रश्मी सावंत
  13. प्रभाग क्र. 7 (ब)     सौ. स्वप्नाली खामकर - पाचंगे 
  14. प्रभाग क्र. 21 (ब)    सौ. संजीता जोशी
  15. प्रभाग क्र. 21 (क) सौ. उर्मिला डोंगरे 
  16. प्रभाग क्र. 11 (क)    सौ. सीमा इंगळे
  17. प्रभाग क्र. 17 (ब)    सौ. पूजा ढमाळ
  18. प्रभाग क्र. 12 (ब )    सौ. रक्षा मांडवकर
  19. प्रभाग क्र 12 (अ) श्री. रूपेश जाधव 
  20. प्रभाग क्र. 18 (क)    सौ. प्राची घाडगे
  21. प्रभाग क्र. 22 (ब)    श्री. रविंद्र सोनार
  22. प्रभाग क्र. 22 (अ)    सौ. प्रज्ञा कांबळे

प्रभाग क्रमांक - 27

  1. अ - प्रकाश दत्ता पाटील
  2. ब - नीता देवेंद्र भगत
  3. क - मयूरी तेजस पोरजी
  4. ड - प्रशांत प्रभाकर गावडे

प्रभाग क्रमांक - 28

  1. ब - रेश्मा नरेश पवार
  2. क - अंकिता अनंत कदम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com