जाहिरात

Mamledar Misal: ठाण्यातील ‘मामलेदार मिसळ’ची वास्तू पाडली! 70 वर्षांची 'झणझणीत' आठवण जमीनदोस्त; पाहा VIDEO

 तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधील एक सुंदर आठवण संपली आहे. 

Mamledar Misal: ठाण्यातील ‘मामलेदार मिसळ’ची वास्तू पाडली! 70 वर्षांची 'झणझणीत' आठवण जमीनदोस्त; पाहा VIDEO

Thane Mamledar Misal Building News:  ठाणे म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर क्षणात येते ती झणझणीत मामलेदार मिसळ..  ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवारांपर्यंत सर्वांनाच मामलेदार मिसळच्या चवीने भुरळ घातली. खवय्यांना वेड लावणाऱ्या ठाण्यातील मामलेदार मिसळची वास्तु आता इतिहासजमा झाली आहे.  तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधील एक सुंदर आठवण संपली आहे. 

Maharashtra Politics: बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरे- CM फडणवीसांमध्ये खलबतं? मध्यरात्री 2 वाजता वर्षावर भेट...

मामलेदार मिसळची वास्तू इतिहासजमा! 

 ठाणे शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली 'मामलेदार मिसळ' ज्या जुन्या वास्तूतून साऱ्यांच्या जिभेवर राज्य करत होती, ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून, यामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. जरी ही मिसळ आता शेजारील दुसऱ्या वास्तूत स्थलांतरित झाली असली, तरी त्या जुन्या लाकडी बाकड्यांच्या आणि रांगांच्या आठवणी मात्र आता केवळ इतिहासात जमा झाल्या आहेत.

​१९५० च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा प्रवास थक्क करणारा आहे. सरकारी कामासाठी तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार यांच्या हक्काचे खाण्याचे ठिकाण म्हणून या दुकानाची ओळख निर्माण झाली आणि तिथूनच याला 'मामलेदार' हे नाव पडले. केवळ चवच नाही, तर या ठिकाणाने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरे जवळून पाहिली आहेत. 

खवय्यांच्या भावुक प्रतिक्रिया 

अत्यंत साधी बैठक व्यवस्था आणि झणझणीत चवीचा 'कट' हीच या ब्रँडची खरी ताकद राहिली. आज जरी नवी इमारत उभी राहणार असली, तरी जुन्या वास्तूने दिलेली ती आपुलकीची चव ठाणेकर नक्कीच मिस करतील. दरम्यान, या पाडलेल्या वास्तूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मामलेदारच्या ग्राहकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे बसून मिसळवर ताव मारण्याची मज्जाच वेगळी होती. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असं अनेकांनी म्हटलं आहे. 

Amravati News: 16 वर्षाच्या लेकीचा टक्कल करून घरात बसवलं, पालकांची विकृत शक्कल, धक्कादायक कारण समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com