योगेश माने
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे केवळ हवाई वाहतुकीचे केंद्र नाही, तर ते 'नैना' (NAINA) अर्थात Navi Mumbai Airport Influence Notified Area नावाच्या एका नियोजित महानगराच्या उदयाचे केंद्र बनले आहे. सिडकोद्वारे विमानतळाच्या सुमारे 25 किमीच्या परिघाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेमुळे पनवेल, उलवे आणि खारघरसारख्या परिसरातील गुंतवणूकदारांची अक्षरशः 'चांदी' झाली आहे.
नक्की वाचा: नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईला मिळणार बहुमान, लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोच्या पंक्तीत मिळणार स्थान
मालमत्तांचे दर 50% नी वाढले
NDTV ने नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मालमत्तांच्या किंमती किती वाढल्या याचा आढावा घेण्याचं ठरवलं. बरेच गुंतवणूकदार असे आहेत ज्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत गुंतवणूक केली आहे. अटल सेतू आणि विमानतळाच्या कामाचा वेग पाहून त्यांनी इथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्यांना किमान 15% ते 20% फायदा होताना दिसतो आहे. ज्या लोकांनी गेल्या 5-10 वर्षांत इथे घरे, जमिनी घेतल्या त्यांना आता 30% ते 50% टक्के फायदा होताना दिसतो आहे. इथल्या एका रहिवाशाने सांगितले की, त्यांनी 40 लाख रूपयांना फ्लॅट खरेदी केला होता, ज्याची किंमत आज 60 लाख रुपये झाली आहे. अन्य एका महिलेने सांगितले की तिने 18 लाखांना इथे फ्लॅट खरेदी केला होता, ज्याची आज किंमत 38 लाख रुपये झाली आहे. अन्य एका नागरिकाने म्हटले की त्याने 70 लाख रुपयांना घर खरेदी केले होते, ज्याची किंमत आज 1 कोटींच्या घरात पोहोचली आहे. उलवे हे घरखरेदीदारांसाठी हॉट डेस्टीनेशन झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
नक्की वाचा:रोजगाराच्या नव्या संधी, AI आणि स्वच्छ उर्जेच्या वापरावर भर; नवी मुंबई विमानतळ अफलातून आहे
नवी मुंबई आणि मुंबई शहरे अधिक जवळ आली
नवी मुंबईत आयटी पार्क, डेटा सेंटर्स आणि ॲपल आयफोन मॅन्युफॅक्चरिंग युनिटमुळे विकासाला चालना मिळाली होती. नवी मुंबई हे नियोजनबद्धल शहर असल्याने इथे राहणाऱ्यांची संख्याही वाढली आहेत. त्यातच मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी विविध पर्याय उभे राहिल्याने नवी मुंबईमध्ये राहायला येणाऱ्यांची किंवा गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली होती. यामुळे नवी मुंबईला मुंबई2.0 असे म्हणून संबोधले जाऊ लागले आहे असे नाईटफ्रँक इंडियाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, गुलाम झिया यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world