जाहिरात

Washim News : विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन मुलीची तणावातून आत्महत्या

आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने मुलीला दिली होती.

साजन ढाबे, वाशिम

Washim news : विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाघळूद येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीला विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो व विनयभंग यासह विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या)

आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने मुलीला दिली होती. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी तणावात होती. यातून तिने विषारी द्रव्य प्राषण केले असून उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयत तरुणीच्या काकांनी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

(नक्की वाचा-  Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?)

फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोक्सो व विनयभंग, यासह विविध कलमातंर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा पुढील शिरपूर तपास पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com