
Chhatrapati Sambhajinagar News : फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी येथे 30 महिने, 9 वर्षीय आणि 11 वर्षीय बालकांना अचानकपणे लुळेपणा आणि अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातील गावात 30 महिने, 9 वर्षे आणि 11 वर्षांच्या तीन बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला आहे. 12 जुलै रोजी ९ वर्षांच्या मुलाला, त्यानंतर 16 जुलैला 11 वर्षांच्या मुलाला आणि त्यानंतर 17 जुलैला 30 महिन्यांच्या बालकाला उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. यानंतर जिल्ह्या परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे बडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वेक्षण हाती घेण्यात आलं आहे.
तीनही बालकांवर छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन बालकांवर पीआयसीयूमध्ये उपचार सुरू आहे तर एका बालकावर जनरल वार्ड मध्ये उपचार सुरू आहे. तीनही बालक एकमेकांच्या नातेसंबंधात असल्यामुळे गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही बंद करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Beed News : ना पक्का रस्ता, ना पूल... चिुमकल्यांना शाळेसाठी करावा लागतोय जीवघेणा प्रवास
अॅक्युट फ्लॅसीस पॅरॅलिसिस संशयित रुग्ण म्हणून आरोग्य विभागाने तिन्ही बालकांची नोंद केली आहे. या तीनही बालकांना सारखीच लक्षणं असल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जीबीएस की पोलिओ अशी भीती पसरली आहे.
या दोन्ही मुलांचे स्टूल नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. याशिवाय गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सार्वजनिक पाठीवपुरवठ्याचा वापर थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याऐवजी गावात निर्जंतूक केलेले पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world