शुभम बायस्कार, अमरावती
अमरावतीच्या मेळघाटातून आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील जामली आर गावात डेंग्यू बाधित महिला रुग्णांवर जमिनीवर झोपवून उपचार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रधानमंत्री जलजीवन मिशन अंतर्गत गावात जी पाईपलाईन अंथरली तीच पाईपलाईन येथे विपरीत परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याने लिकेज झालेल्या पाईपलाईनमधून गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जमली आर गावात गेल्या 21 दिवसात 9 जण दगावल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तर 23 जणांना अतिसाराची लागण झाल्याचं उघडकीस आलं. तिघांचा मृत्यू हा अतिसाराची लागण झाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
(नक्की वाचा - कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट? )
आरोग्य विभागाकडून 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या लिकेज झालेल्या पाईपलाईनमधून गावात अतिसाराची लागण पसरली ती पाईप लाईन बंद केल्याचं देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिसाराच्या रुग्णांची प्रकृती बरी होत नाही तोच जामली आर गावात 7 डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
परिस्थितीचं गांभीर्य पाहता आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेत अस्थाई स्वरूपाचा दवाखाना उभारून थातुरमातुर उपाययोजना केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याच ठिकाणी डेंगू बाधित असलेल्या महिलांवर जमिनीवरच उपचार सुरू असल्याचं समोर आलं आहे.
(वाचा- Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद )
नव्या वंदे मेट्रोची रचना अशा प्रका
खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार राजकुमार पटेल आदींनी या ठिकाणी भेटी देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेतला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्यापही या ठिकाणी भेट दिली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. लोकप्रतिनिधीनी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्याचेही सांगितले. मात्र तरीही रुग्णावर जमिनीवरच उपचार सुरू असल्याचे दिसून आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world