अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांचा पदाचा त्वरित राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नितीन दिनकर महिलांना आमिष दाखवून त्यांचा गैरवापर करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलवणे, बियर बारमध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशाप्रकारे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहे. अशा पद्धतीची लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली आहे.
(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे दहशत माजवून इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी दाखल केले आहेत, अशीही तक्रार महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे दिली आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळची ही व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी बोलत नाही, बोलल्यास ते एखाद्या गुन्ह्यात अडकवतात.
Nitin Dinkar
श्रीरामपूर येथे एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यात दिनकर यांचे वास्तव्य असून तिथे अनेक गैरप्रकार चालतात, असे महिलांनी सांगितले. महिलांनी याबाबतचा जून महिन्यातील श्रीरामपूरजवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत असल्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे दिला आहे, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- Kabaddi Player Dies VIDEO : कुत्र्याचा चावा जीवावर बेतला; कबड्डी खेळाडूचा तडफडून मृत्यू)
अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महिलांबाबतीत असे चुकीचे कृत्य प्रकार करत असतील तर त्याला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी तातडीने नितीन दिनकर यांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे केली आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष रविंद्र देसाई, विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे यांनाही सदर तक्रार मेलद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून याची पूर्णपणे माहिती घ्यावी, असेही देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.