अर्जुन गोडगे, धाराशिव
नाताळ व नवीन वर्ष स्वागताचा सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने पहाटे 1 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी आदेश काढले आहेत.
नाताळच्या सुट्या, नवीन वर्ष तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तुळजाईनगरीत भाविकांची गर्दी होत आहे. आगामी आठ दिवस 1 जानेवारी भाविकांची गर्दी कायम राहणार असून, या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार 1 जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार असून, अभिषेक पूजा सकाळी 6 वाजता होणार असल्याचे जाहीर प्रगटन मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माळी यांनी काढले आहेत. मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे पुजारी, भाविकांतून स्वागत करण्यात येत आहे.
आजपासून मंदिराच्या वेळेत बदल केला आहे.25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. तर रात्री 10.30 च्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world