उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासल्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. मात्र हे प्रकरण ताजं असतानाच आता उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचं समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे औसा येथील सभा संपल्यावर धाराशिवमधील उमरगा येथे सभेसाठी रवाना होणार होते. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने सभास्थळी जाणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाकारली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारस्तव सोलापूर आणि लातूर, धाराशिव यात बरेच अंतर आहे. तरी देखील सर्व उड्डाणे थांबावण्यात आली आहेत.
(नक्की वाचा- VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात)
यवतमाळमध्ये बॅग तपासल्या
उद्धव ठाकरे यांची सोमवारी विदर्भातील यवतमाळ जिल्हातील वणी येथे सभा झाली. याआधी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे यावरुन जबरदस्त संतापल्याचे पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरुन त्यांनी संबंधित यंत्रणा महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
(नक्की वाचा- अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)
मोदी-शाहांची बॅग तपासली का?
"मी यंत्रणेला सांगत आहे की मी अजिबात रागावलो नाही. तुम्ही तुमचे काम करताय, मी माझे काम करतोय. यानंतर मी त्याला म्हणालो मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको? असा सवाल करत उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.