जाहिरात

Ulhasnagar Crime: एका जीन्स पॅन्टसाठी जीवघेणं कृत्य! तरुणाचं अपहरण, टोळक्याने बेदम मारलं

धनराज कुमार गौतम हा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनराज हा कॅम्प क्रमांक ५ च्या दुर्गादेवी पाडा भावेश कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहे. 

Ulhasnagar Crime: एका जीन्स पॅन्टसाठी जीवघेणं कृत्य! तरुणाचं अपहरण, टोळक्याने बेदम मारलं

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.जीन्स पॅन्ट चोरीच्या आरोपावरून एका कामगारावर ६ ते ७ जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त झाला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Kalyan News: BPचा त्रास, 1 किडनी अन् दर 6 तासांनी तपासणी! कोर्टात मारकुट्या रमेश म्हात्रेने युक्तीवाद काय?

जीन्स पॅन्ट दोरीच्या वादातून मारहाण 

समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात जीन्स पॅन्ट चोरीच्या आरोपावरून एका कामगारावर ६ ते ७ जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ह्या हल्ल्यात धनराज कुमार गौतम हा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनराज हा कॅम्प क्रमांक ५ च्या दुर्गादेवी पाडा भावेश कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहे. 

धनराजची पत्नी ही जीन्स पॅन्टचे धागे कापण्याचं काम करते,जीन्स कारखानेचे मालक अज्जू गौतम याने जीन्स पॅन्टचे धागे कापण्यासाठी धनराज यांच्या पत्नीकडे दिले होते,परंतु त्यातील एक बंडल चोरी झाल्याचं म्हणणं धनराज चं आहे,तशी कल्पना मालकाला देण्यात आली होती,परंतु जीन्स कारखानदार अज्जू गौतम आणि त्याच्या इतर साथीदारांनी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धनराज याला घरातून उचलून कारखान्यात नेहून जीवघेणा हल्ला केला.

नक्की वाचा - Trending News: ही डॉक्टर तर वाघीण निघाली! थेट पिंजऱ्यात घुसून नरभक्षी वाघीणीला केलं जेरबंद, पिंजऱ्यातला थरार

आणि जीन्स पॅन्ट चोरी केल्याचं आरोप करण्यात आलंय. या हल्ल्यात धनराजला कैची, लोखंडी रॉड, लाकडी बांबू, आणि लोखंडी मशीन डोक्यात आपटून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. आता ह्या हल्ल्या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धनराजच्या कुटुंबियांनी केली आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com