विदर्भात अवकाळीचा तडाखा; बुलडाणा, वाशिम, अकोल्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं

बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लागली.

जाहिरात
Read Time: 2 mins

विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लागली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.    

बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व तालुक्याला मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि तुफानी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शहर व परिसरात अनेक घरांची पडझड झाली आहे. शेगावमध्ये सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक जोरदार वारा सुरु झाला. यामध्ये शेगाव शहरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

नक्की वाचा - 'या' गावात चक्क महिला ओढतात हनुमानाचा रथ, ब्रिटीश काळापासून सुरु आहे परंपरा

वाशिममध्ये हळद पिकाचं नुकसान

वाशिममधील कारंजा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे उकड्यांने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही दिलासा मिळाला आहे. मात्र अवकाळीमुळे शेतात उकडून वाळवण्यासाठी ठेवलेल्या हळद पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा - नूडल्सच्या पाकिटात हिरे, अंडरगार्मेंट्समध्ये सोनं! मुंबई विमानतळावर 6.46 कोटींचा माल जप्त)

अकोला जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान याठिकाणी झालं. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान हवामान विभागाने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला होता. त्यानुसार आज अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article