'वैभव नाईक स्वतःवर हल्ला करुन घेणार', निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

माझ्यासमोर उबाठाचे जे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसांमध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा निलेश राणेंनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

 गुरु दळवी, रत्नागिरी: माझ्यासमोर उबाठाचे जे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसांमध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणालेत निलेश राणे? 

'एका गंभीर विषयासाठी मी आपल्यासमोर येत आहे. माझ्यासमोर उबाठाचे जे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसांमध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. असं काही त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे कारण काय सगळे पर्याय त्यांनी वापरून बघितले आहेत, निवडणूक त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. म्हणून एक शेवटचा पर्याय म्हणून वातावरण बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि आणि त्यांच्यावर हल्ला झाला हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतील. 

माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे सन्माननीय एस पी साहेबांना पत्र देखील देणार आहे. त्यांना जे काही प्रोटेक्शनसाठी आपल्याला देणं जर वाटत असेल त्यांना वेगळा पोलिसांचा स्टाफ द्याव कृपया त्यांना द्या. कारण काय होईल जागेवरच ते आरोपी पकडले जातील यावरच पोलिसांना कळेल की हा हल्ला झाला आहे की स्वतःवर हल्ला करण्यात आलेला आहे.

Advertisement

नक्की वाचा: 'मोदींचा खुर्च्यांशी संवाद...', शिवाजी पार्कवरील सभेवरुन ठाकरेंचा खोचक टोला

पोलिसांना केली विनंती

 म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे, माझे पण फोन टॅप करा माझे लोकेशन ट्रॅक करा वैभव नाईकांचाही लोकेशन आणि फोन टॅप करा म्हणजे ह्याच्यातलं खरं खोटं कळेल. आम्हाला या निवडणुकीत वातावरण बिघडवायचं नाही अतिशय शांतपणाने ही निवडणूक चालू आहे. आमचे सगळे कार्यकर्ते या निवडणुकीचे शांतपणे काम करत आहेत असं जर कोण वातावरण बिघडवण्याचा काम करत असेल तर ते बरोबर नाही ते आत्ताच लोकांना खरं खोटं कळलं पाहिजे. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे वैभव नाईकांना हे करण्याच्या अगोदर जे तुम्हाला वाटत असेल योग्य ते पोलिसांनी पावलं उचलली पाहिजेत. कारण या विषयामुळे वातावरण कोणी घडवण्याचं प्रयत्न करत असेल तर ती पोलिसांवर पण जबाबदारी आहे असं मला वाटतं.

आमच्याकडून जर काही सहकार्य लागेल पोलिसांनी आम्हाला कधीही सांगावं आम्हाला काहीच त्याच्यामध्ये देणंघेणं नाही, पण जर कोणी स्वतःवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर आता माझं काम आहे सांगण्याचं. मी पोलीस डिपार्टमेंटला सांगत आहे असं कदाचित करण्याच्या ते तयारीत आहेत तर आता पुढची जी काही कारवाई आहे ती पोलिसांनी करावी एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो आहे असे थेट आरोप निलेश राणे यांनी केला आहे. 

Advertisement

महत्वाची बातमी: 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले