जाहिरात

Mumbai News : तरुणाने रात्री 1 वा. राममंदिर स्थानकावर केली प्रसूती; बाळाच्या आरोग्याबाबत हृदयद्रावक माहिती

राममंदिर स्थानकावर जन्माला आलेल्या त्या बाळाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai News : तरुणाने रात्री 1 वा. राममंदिर स्थानकावर केली प्रसूती; बाळाच्या आरोग्याबाबत हृदयद्रावक माहिती

पश्चिम रेल्वेच्या राममंदिर (Ram Mandir Station) स्थानकावर काही दिवसांपूर्वी एक तरुणाने महिलेची प्रसुती केली होती. एका महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवरुन त्याला मार्गदर्शन केलं आणि प्रसंगावधान राखत त्याने महिलेची प्रसूती केली होती. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अनेकांनी त्या तरुणाचं कौतुक केलं. राजकीय नेत्यांनीही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 

राममंदिर स्टेशनवर जन्माला आलेल्या त्या बाळाच्या हृदयाला छिद्र (Hole in the baby's heart) असल्याचं समोर आलं आहे. आई अंबिका झा (२४) हिची प्रसुती झाल्यानंतर तिला महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे तिची तपासणी करण्यात आली होती. सिनेमॅटोग्राफर असलेल्या विकास बेद्रे या तरुणाने महिला डॉक्टर देविका देशमुख हिला व्हिडिओ कॉल करीत अंबिका झा हिची प्रसूती केली होती. दरम्यान बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Maharashtrachi Hasya Jatra: MHJ च्या टीमने मन जिंकले, अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी

नक्की वाचा - Maharashtrachi Hasya Jatra: MHJ च्या टीमने मन जिंकले, अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी

कूपरच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, अंबिकाने नायर रुग्णालयात प्रसूतीपूर्व तपासणी केली होती. त्यावेळी बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याची माहिती होती. मात्र तत्काळ त्याच्यावर कोणतेही उपचार करण्याची गरज नाही. भविष्यात मात्र त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com