जाहिरात

Raigad News: गावकऱ्यांनी रचलं स्वत:चं सरण! पोलादपूरच्या सुतारवाडीतील ग्रामस्थांवर का आली वेळ?

अशा स्थितीत इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था सुतारवाडीतील ग्रामस्थांची झाली आहे.

Raigad News: गावकऱ्यांनी रचलं स्वत:चं सरण! पोलादपूरच्या सुतारवाडीतील ग्रामस्थांवर का आली वेळ?
रायगड:

मेहबूब जमादार 

देशात स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरदार सुरू आहे. अशा वेळी रायगड जिल्ह्यातील एका गावात वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे. हे गाव पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी हे आहे. या गावातल्या लोकांनी स्वत:चंच सरण रचलं होतं. शिवाय 15 ऑगस्टला सामूहीक आत्मदहनाचा इशाराही या ग्रामस्थांनी दिलेला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याची माहिती स्थानिक आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांना मिळाली. त्यांनी हस्तक्षेप करत एक वर्षात या गावाचं पुनर्वसन करू असं आश्वासन दिलं. शिवाय भूमीपूजनही करून टाकलं. त्यामुळे या  गावकऱ्यांनी आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी आहे. या गावावर 2021 मध्ये दरड कोसळली होती. यात संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं. गावकऱ्यांचे संसारच उद्धवस्त झाले. सर्वांची घरं गेली. गावकरी बेघर झाले. त्यावेळी सरकारने गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. पण आज चार वर्ष झाले तरी गावात पुनर्वसनाची एक वीट ही लागलेली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आमचं पुनर्वसन कधी होणार असा संतप्त सवाल हे गावकरी करत होते. पण त्यांचा आवाज ऐकणार कोण? हा ही प्रश्न निर्माण झाला आहे. 

नक्की वाचा - Raj Thackeray: 'मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्विकारतो!', राज ठाकरेंनी कार्यकर्त्याचीच घेतली फिरकी, पाहा Video

कारण त्यांचा आवाज ऐकला गेला असता तर त्यांचे कधीच पुनर्वसन झाले असते असे गावकरी म्हणतात. प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीचा आभाव या मुळे आज ही ग्रामस्थ पुनर्वसनापासून लांब आहेत. गावाचे पुनर्वसन न झाल्यामुळे गावकऱ्यांना भाड्याच्या घरात रहाण्याची वेळ आली आहे. वाडीत पक्की घरं आहेत. पण शासनाने ती धोकादायक जाहीर केली आहेत. त्यामुळे त्या घरांमध्ये ही त्यांना राहाता येत नाही. 

नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?

अशा स्थितीत इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था सुतारवाडीतील ग्रामस्थांची झाली आहे. सुतारवाडीतील 44 कुटुंबांना गेली चार वर्ष भाड्याने घर घेऊन रहाण्याची वेळ आली आहे. शासन पुनर्वसन  करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला त्यांनी दिला होता. मात्र त्यात मंत्री भरत गोगावले यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी थेट सुतारवाडी गाठली. तिथे ग्रामस्थां बरोबर चर्चा केली. शिवाय एका वर्षात गावाचं पुनर्वसन करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर गावकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com