जाहिरात

लातूर तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 103 जणांच्या वडिलोपार्जित जमिनीवर दावा

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे.

लातूर तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 103 जणांच्या वडिलोपार्जित जमिनीवर दावा
लातूर:

लातूरच्या अहमदपूरमधील तळेगावच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाकडून याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या शेतकऱ्यांकडून या दाव्याचा विरोध केला जात आहे. वडिलोपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नक्कीच नाहीत असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदन केलं आहे. आपल्याला या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्यांनी केली आहे.

EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार

नक्की वाचा - EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिकेन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आलं आहे. अपील, दावे, निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी अपीलाच्या अंतिम निकालासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 

कॉलेजमधील मशीद आणि परिसरावर वक्फ बोर्डाचा दावा, वाराणसीत नवा वाद उफाळला

नक्की वाचा - कॉलेजमधील मशीद आणि परिसरावर वक्फ बोर्डाचा दावा, वाराणसीत नवा वाद उफाळला

ज्यावर तुम्ही आपल्या बचावाच्या समर्थनावर अवलंबून राहण्याचा हेतू आहे. आपण वर नमूद केलेल्या तारखेला उपस्थित न राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, असेही नमूद केले आहे. वडिलोपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नक्कीच नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी एक लेखी निवेदन सादर केलं आहे. आपल्याला या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्यांनी केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: