Wardha Car Accident : वर्ध्यात भीषण अपघात; तीन मित्रांचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

Wardha Car Accident : मृतांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर धनराज धबर्डे असं जखमी युवकाचे नाव आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

निलेश बंगाले, वर्धा

वर्ध्यातील सेलू येथे झालेल्या भीषण कार अपघातात तीन मित्रांचा मृ्त्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. नागपूर येथून वर्ध्याकडे जाताना या कारचा भीषण अपघात झाला. तुळजापूर - नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्यावर घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कार वेगात असताना चालकाला डुलकी लागली. त्यानंतर कार अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडला. कार वेगात असताना अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली उतरून तीन-चार वेळी उलटली आणि रस्त्याच्या खाली पडली.

(नक्की वाचा-  संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव)

अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर  नागपूर येथे उपचाराला नेले जाते असताना तिसऱ्याचा मृत्यू झाला. आणखी एक जण जखमी झाला आहे. कारमधील सर्वजण वर्ध्याच्या सिंदी मेघे येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. 

(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)

मृतांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर धनराज धबर्डे असं जखमी युवकाचे नाव आहे. जखमी धनराजवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत.

Advertisement