जाहिरात

Wardha Crime: मीडिया जगतात खळबळ! रील स्टार काजलचा मृत्यू, जलाशयात आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?

जलाशयाजवळ तिची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.

Wardha Crime: मीडिया जगतात खळबळ! रील स्टार काजलचा मृत्यू, जलाशयात आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?

निलेश बंगाले, वर्धा:

Wardha Reel Star Death:  दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपे याचे निधन झाल्याने खळबळ उडाली होती. अरुण तुपेच्या बातमीने मीडिया जगताला मोठा धक्का बसला होता. अशातच आता वर्ध्यामध्ये 17 वर्षीय रीलस्टारचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. काजल गजानन रोकडे (वय १७, रा. गजानन नगर आर्वी नाका वर्धा)  असं या मुलीचे नाव आहे. 

वर्ध्यात 17 वर्षीय रिलस्टार मुलीचा मृतदेह आढळला! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा जलाशयात  एका १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. काजल गजानन रोकडे (वय १७, रा. गजानन नगर आर्वी नाका वर्धा) असं मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव आहे. काजल ही सोशल मीडियावर रील्स बनवत होती. तिचा मोठा चाहता वर्ग होता. तिचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून ही आत्महत्या आहे की घातपात? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

MSRTC Recruitment: एसटी महामंडळात महाभरती! 17 हजार 742 पदे भरणार, कुणाला प्राधान्य? वाचा A टू Z माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, काजल मंगळवारी वर्धा येथील घरून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मोबाईलचे लोकेशन तपासल्यावर ते सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा जलाशय परिसर दाखवत होते. कुटुंबीयांनी रिधोरा येथे येऊन पाहणी केली असता जलाशयाजवळ तिची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून तपास सुरु 

माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बोटीच्या सहाय्याने जलाशयात शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी बुधवारी दुपारी सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास युवतीचा मृतदेह पाण्यात आढळून आला. कुटुंबीयांनी रिधोरा येथे येऊन पाहणी केली असता जलाशयाजवळ तिची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले.

 परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. युवतीने वर्धा येथून रिधोरा येथे येऊन आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा अधिक तपास सेलू पोलीस करत आहेत.

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com