जाहिरात
4 hours ago

मोठे आवाज करणारे फटाके उडवू नका पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा. पुणे महानगरपालिकेचे नागरिकांना दिवाळीतील फटाके उडवण्यासंदर्भात आवाहन केलं आहे. अंधार दूर करून प्रकाश करणारा मांगल्याचा उत्सव म्हणजे दिवाळी. ती पर्यावरण पूरक करण्याचं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. दिवाळीत हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके विरहित दिवाळी साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Live Update : सोयाबीन शेतकऱ्यांना दुहेरी फटका, उत्पादनात घट; शेतकऱ्यांना 3500 ते 3800 रुपये भाव

 वाशिम जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि अनियमित पावसामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे.त्यामुळे एका एकरातून केवळ २ ते ४ क्विंटल इतकेच उत्पादन हाती येत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी या पूर्णतः हवालदिल झाले असून बाजारसमितीत नव्या सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली असून नाफेड बंद असल्याने शेतकऱ्यांना ३५०० ते ३८०० रुपये भाव मिळत आहे. 

Live Update : पुणे जिल्हा सत्र न्यायालयात चौथ्या मजल्यावरून उडी मारत एकाची आत्महत्या

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात चौथ्या मजल्यावरून उडी मारत एकाची आत्महत्या 

कोर्टात केस बोर्डावर येत नाही वैतागलेल्या नागरिकाने केली आत्महत्या 

पोलीस घटनास्थळी दाखल 

पुढील तपास सुरू 

Live Update : आशियातील सर्वात मोठा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वे एक्स्पो

आशियातील सर्वात मोठा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वे एक्स्पो

१५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान दिल्लीतील भारत मंडपम, नवी येथे रेल्वे एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. 

या एक्स्पोमध्ये आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे तंत्रज्ञान, नवकल्पना आणि गुंतवणुकींचा मेळा पाहायला मिळेल. रेल्वे क्षेत्रातील जागतिक कंपन्या आणि तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत.

Live Update : गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यासाठी ड्रोन द्वारे होणार पेट्रोलिंग

वारंवार कारवाई केल्यानंतर गांजासारख्या अमली पदार्थांचे उत्पादन धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याविरोधात ड्रोनसारख्या आधुनिक साधनांचा वापर करून पेट्रोलिंग करण्याचा तोडगा शोधण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने पोलिस आणि वन विभागाद्वारे एक महिन्याच्या कालावधीसाठी तंत्रज्ञानयुक्त पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली असून त्यात अधिकारी व कर्मचारी मिळून 25 जणांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे.

गांजासारख्या अमली पदार्थांची सर्वाधिक लागवड शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली जाते. या पोलिस ठाण्यांतर्गत 40 गावे असून, त्याव्यतिरिक्त 144 लहान- मोठे पाडे आहेत. त्यातील बहुतांश पाडे सातपुड्याच्या डोंगररांगेत आहेत. 50 किलोमीटरची पूर्व-पश्चिम हद्द असून, मध्य प्रदेशाच्या सीमेस बराचसा भाग जोडला आहे. तेथील बरीचशी शेती वन विभागाच्या अखत्यारीत आहे. याच जमिनीत गांजाची लागवड केली जाते. पोलिसांकडून व्यापक कारवाई होऊनही डोंगर उतारावर, नाल्यात, आंतरपीक स्वरूपात, दुर्गम भागात गांजाची शेती सुरूच असते. ही बाब लक्षात घेऊन गांजा उत्पादन होणाऱ्या भागाची माहिती मिळविण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोहिमेचे नियोजन केले आहे. 

या कारवाईत वन विभागाचे 20 कर्मचारी आणि पोलिसांचे 15 कर्मचारी, अशा 35 जणांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. गांजाचे उत्पादन अधिक असलेल्या भागात पेट्रोलिंग आणि ड्रोनद्वारे टेहळणी करण्याचे काम पथकाद्वारे सुरू करण्यात आले आहे.

Live Update : पंढरपुरात आज विठ्ठल मूर्ती संरक्षण दिन...

अफजलखान ,औरंगजेब अशा परकीय आक्रमणावेळी पंढरपूरची विठ्ठल मूर्ती देगावच्या पाटलांच्या वाड्यात संरक्षणासाठी चार वर्षे ठेवण्यात आली होती. याच घटनेला आज  330 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रतिवर्षी देगावच्या पाटलांच्या वाड्यातील तळघरात आणि विहिरीमध्ये विठ्ठल मूर्ती संरक्षण उत्सव साजरा केला जातो. यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाच्या पादुकांचे देगावकडे प्रस्थान झाले आहे. संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी देगावच्या सूर्याची पाटलांकडे विठ्ठल मूर्ती चार वर्षासाठी दिली होती. आज सूर्याची पाटील यांचे तेरावे वंशज आमदार अभिजीत पाटील हा उत्सव साजरा करत आहेत. 

Live Update : सोशल मीडियावर रिल बनवणे पडले महागात, मालेगाव तालुका पोलिसांची कारवाई

मालेगाव ग्रामीण पोलिसांनी ' कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ' या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर दहशतीचे वातावरण निर्माण करत रिले बनवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अजय बाबु जाधव असे या तरुणाचे नाव असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मीडियावर त्याने दहशतीचा व्हिडिओ तयार केला होता. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याचेकडून धारदार शस्त्रे जप्त करत गुन्हा दाखल केला आहे..नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे..

Live Update : पतीसह दुचाकीने जात असताना ट्रकने दिली धडक, पत्नी जागीच ठार

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी पतीसह दुचाकीने जात असताना साकोली कडून येणाऱ्या ट्रकने धडक दिली असून अपघातात पत्नीच्या जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव जन सुविधा केंद्र समोर घडली असून वैशाली विजय शेंडे असे मृत पत्नीचे नाव असून विजय बजीराम शेंडे असे गंभीर जखमी पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली घटना नंतर ट्रकचालक ट्रकसह पसर झाला असून लाखनी पोलिसांनी मौदा येथील टोल नाक्यावर टक पकडण्याची माहिती दिली आहे. तर उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असून पुढील तपास लाखनी पोलीस स्टेशन करत असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com