जाहिरात
This Article is From Jun 13, 2024

पतीला मैत्रिणीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं, पत्नीचा पारा चढला अन् पुढे जे घडलं...

मैत्रिणीसोबत राहणाऱ्या पतीला पत्नीने शिकवला चांगलाच धडा, पुढे जे काही घडलं त्यामुळे पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

पतीला मैत्रिणीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं, पत्नीचा पारा चढला अन् पुढे जे घडलं...

दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या पतीला पत्नीने चांगलाच धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी पत्नी आणि मुलांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर तो आपल्या एका मैत्रिणीसोबत राहू लागला. यामुळे पत्नीने पतीला अद्दल घडवण्याचे ठरवले. तिनं पतीला चांगलाच चोप दिला, तसेच ती इथवरच थांबली नाही. तर तिने पतीसोबत राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला चक्क घराच्या गेटला बांधून ठेवले. छत्रपती संभाजीनगरमीधल वाळुज महानगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंदही करण्यात आली आहे.

(नक्की वाचा: ससून हॉस्पिटलचा आणखी एक भोंगळ कारभार, रुग्णांवर या गोष्टीसाठी टाकला जातोय दबाव)

मैत्रिणीला घरामध्ये आणले

एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत असलेला 50 वर्षीय व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसह वडगाव परिसरात राहत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. यावरून घरामध्ये वाद होऊ लागले. हे वाद इतके विकोपाला गेले की एक दिवस पतीने पत्नीसह दोन्ही मुलांना घराबाहेर हाकलून दिले आणि यानंतर त्याने मैत्रिणीला घरात आणले. पर्याय नसल्याने पत्नी माहेरी राहायला गेली. मुले मोठी असल्याने कामानिमित्त एक जण पुण्याला तर दुसरा हैदराबादला निघून गेले. 

(नक्की वाचा: सूनेवर वाईट नजर, मुलानेच वडिलांना संपवलं; 15 दिवस पोलिसांना फिरवलं अखेर...)

अन् पत्नीचा पारा चढला...

पतीने हाकलून दिल्यानंतर माहेरी गेलेली महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी रांजणगाव येथे आली होती. याचवेळी ती आपल्या भावाला घेऊन पतीच्या घरी गेली. पण घरी गेल्यावर तिला धक्काच बसला. कारण या महिलेचा पती आणि त्याची मैत्रीण घरामध्ये रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळालं. हे सर्व पाहून पत्नीचा पारा चढला आणि तिने तिथेच आपल्या पतीला चोप दिला. तर पतीच्या मैत्रिणीला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवलं. हे सर्व पाहून परिसरातील लोकांची गर्दी वाढली. याचवेळी कुणीतरी पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. शेवटी पोलिसांनी महिलेची सुटका केली आणि प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. दोन्ही बाजू ऐकून पोलिसांनी या सर्व घटनेची नोंद पोलीस डायरीमध्ये केली आहे.

(नक्की वाचा : डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक)

Pune Car Accident Updates | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, बालहक्क न्यायालयाचा मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com