जाहिरात

Jalgaon News : जळगावचे तापमान पन्नाशी गाठणार? हवामान तज्ज्ञांच्या अंदाजाने चिंता वाढली

Jalgaon News : राजस्थान, मध्यप्रदेशातून येणारे उत्तरी व पश्चिमी वारे हे जळगावकडे वाहतात. त्यामुळे वाळवंटाच्या प्रदेशातून वाहणारे हे उष्ण वारे उष्णतेत भर टाकतात.

Jalgaon News : जळगावचे तापमान पन्नाशी गाठणार? हवामान तज्ज्ञांच्या अंदाजाने चिंता वाढली

मंगेश जोशी, जळगाव

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे अनेकदा जास्त असते. बदलते वातावरण रस्त्यांची होत असलेले कॉंक्रिटीकरण, प्रदूषणात झालेली वाढ, यासह विविध कारणांनी जळगाव जिल्ह्याचे तापमान यावर्षी 49 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पाच वर्षात जिल्ह्याचे तापमान हे 50 अंशावर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ व भौगोलिक अभ्यासकांनी वर्तवला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या दहा वर्षात जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 42 ते 45 अंशापर्यंत होते. मात्र गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 47 अंशापर्यंत पोहोचले. त्यामुळे दरवर्षी सरासरी पेक्षा तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होत असून यावर्षी जिल्ह्याचे तापमान हे 49 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षात जिल्ह्याचे तापमान हे पन्नाशी पार करणार असल्याचा भौगोलिक अभ्यासकांनी अंदाज वर्तवला आहे. 

(नक्की वाचा-  Nashik News : 11 पूल, अनेक पायाभूत सुविधा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा कायापालट होणार)

जळगावमधील तापमानाचे नेमके कारण काय ? 

जळगाव जिल्हा हा समुद्रापासून सुमारे 400 ते 450 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तापमान नियंत्रित होत नसल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान हे जिल्ह्याचे पाहायला मिळते. अरबी समुद्रात उच्च दाब तयार होतो, ज्यामुळे आकाश स्वच्छ राहते व सूर्यकिरण थेट जमिनीवर पडून उष्णता शोषली जाते. जळगावसारख्या उष्ण प्रदेशात ही प्रक्रिया अधिक तीव्रतेने घडते.

राजस्थान, मध्यप्रदेशातून येणारे उत्तरी व पश्चिमी वारे हे जळगावकडे वाहतात. त्यामुळे वाळवंटाच्या प्रदेशातून वाहणारे हे उष्ण वारे उष्णतेत भर टाकतात. जळगाव जिल्हा हा 21 अंश N अक्षांशावर कर्कवृत्ताजवळ असल्याने हा उष्ण कटिबद्ध प्रदेशात मोडतो. मार्च ते जूनपर्यंत सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी वर असल्याने सूर्यकिरण अधिक तीव्र होतात व जमिनीवर उष्णतेची मात्रा वाढते. 

(नक्की वाचा - Job Opportunities : पुणे की बंगळुरू, कोणतं शहर नोकरदारवर्गासाठी बेस्ट? 'त्या' LinkedIn पोस्टवरुन चर्चेला उधाण)

भौगोलिकदृष्ट्या तापमान वाढीची कारणे 

भौगोलिकदृष्ट्या जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाची विविध कारणे आहेत. बदलते वातावरण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे देखील तापमानात वाढ होण्यास भर पडत आहे. गाव खेड्यापासून ते शहरी भागापर्यंत गल्लोगल्लीत होणारे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाढते औद्योगिक क्षेत्र, वाढते प्रदूषण व झपाट्याने घटत असलेली हिरवळ अशा विविध कारणांनी तापमानात वाढ होत असल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: