Beed News : सासऱ्याचा प्रेमविवाह, जात पंचायतीची सुनेला सात पीढ्या लक्षात ठेवतील अशी शिक्षा  

Beed Crime news : मालन फुलमाळी पीडित महिलेचं नाव आहे. तर नरसु फुलमाळी असं या महिलेच्या सासऱ्यांचं नाव आहे. नरसु फुलमाळी हे तीरमाली समाजाचे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

जात पंचायतीच्या न्यायाचा अजब प्रकार समोर आला आहे. सासऱ्याने प्रेम विवाह केला, याची शिक्षा सुनेला मिळाली आहे. जात पंचायतीने महिलेला शिक्षा म्हणून तिच्या सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत केलं आहे. बीडमधील आष्टीमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मालन फुलमाळी पीडित महिलेचं नाव आहे. तर नरसु फुलमाळी असं या महिलेच्या सासऱ्यांचं नाव आहे. नरसु फुलमाळी हे तीरमाली समाजाचे आहेत. नरसु यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र याबाबत त्यांना समाजाची परवानगी घेतली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने नरसु फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. 

(नक्की वाचा- अक्षय शिंदेच्या दफनविधीची जागा शोधा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश)

मात्र अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड त्यांनी भरला नाही. त्यानंतर जात पंचायतीने मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

(नक्की वाचा -  बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक, तपासात धक्कादायक माहिती आली समोर)

आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे 22 सप्टेंबर 2024 रोजी हा प्रकार घडला. मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस या प्रकरणाच सविस्तर तपास करत आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article