शरद पवार गटाच्या नेत्याकडून ब्लॅकमेलिंग, 25 लाखांची मागणी, यशोमती ठाकूर यांचे खळबळजनक आरोप

काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 शुभम बायस्कर, अमरावती:  अमरावतीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वऱ्हाडे यांनी मला 25 लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केलं असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या व तिवसा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सुनील वऱ्हाडे हे  स्वतः च्या फायद्यासाठी सगळं करतात पक्षाचे हिताचे काम सुनील वऱ्हाडे करत नाही ते व्यापारी आहे त्यामुळे मला ब्लँकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप यशोमचे ठाकूर यांनी केला आहे.

नक्की वाचा: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला

सुनील वऱ्हाडे यांनी 25 लाख रुपये द्या मी प्रचार करणार नाही दवाखान्यात ऍडमिट होतो असं म्हटले असल्याचा  दावा यशोमती ठाकूर यांनी केला. दुसरीकडे वऱ्हाडे यांनी यशोमती ठाकूर यांचे हे सर्व आरोप फेटाळू लावले आहेत तसेच मी यशोमती ठाकूर यांच्यावर मानहानी दावा ठोकणार व मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया सुनील वऱ्हाडे यांनी दिली.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील तेवासा मतदार संघामध्ये काँग्रेसकडून यशोमती ठाकूर या चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून राजेश वानखेडे यांचे आवाहन आहे. २०१९ मध्ये यशोमती ठाकूर यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी करत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली होती. 

Advertisement

महत्वाची बातमी: सर्वसामान्य 'गॅस'वर, CNG च्या किंमती 6-8 रुपयांनी वाढण्याची शक्यता