जाहिरात

सर्वसामान्य 'गॅस'वर, CNG च्या किंमती 6-8 रुपयांनी वाढण्याची शक्यता

निवडणुका झाल्यानंतर कधीही या दरवाढीची घोषणा केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. 

सर्वसामान्य 'गॅस'वर, CNG च्या किंमती 6-8 रुपयांनी वाढण्याची शक्यता
मुंबई:

मुंबई आणि दिल्लीतील सीएनजी (CNG) च्या किंमती किलोमागे 6-8 रुपये वाढण्याची शक्यता आहे. वितरण करणाऱ्या कंपन्यांकडे सीएनजीची आवक कमी झाल्याने या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशांतर्गत सीएनजीची आवक कमी होत असल्याने महानगर गॅस आणि इंद्रप्रस्थ गॅस या सारख्या कंपन्यांवर विपरीत परिणाम होत आहे. ज्यामुळे ही भाववाढ अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन कंपन्या मुंबई आणि दिल्लीमध्ये सीएनजीचे वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत. सीएनजीची  परिणाम झाल्याने कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 

नक्की वाचा : ग्राहकांना स्वस्ताईची ढेकर, नवा भिडू येताच कोल्ड ड्रिंक्सच्या किमती झाल्या थंड

गॅसच्या वितरणावर होत असलेल्या परिणामांमुळे खर्च वाढत असून त्यामुळे कंपन्यांच्या मार्जिनवरही परिणाम होत आहे. ONGC ने ऑक्टोबर महिन्यात ग२सच्या दरात कपात केली होती. त्यावेळी एमके रिसर्चने म्हटले होते की गॅस कंपन्यांना किंमती किलोमागे 3-3.5 रुपयांनी वाढवाव्या लागतील. इंद्रप्रस्थ गॅसच्या व्यवस्थापनाने दुसऱ्या तिमाहीच्या निकालांबाबत बोलताना   म्हटले होते की दिल्लीमध्ये सीएनजीच्या किंमती किलोमागे 5 रुपयांनी आणि इतर राज्यात 5.5 रुपयांनी वाढवण्याची गरज आहे. GAIL (गेल) ने शुक्रवारी दुसरी कपात जाहीर केल्यानंतर सिस्टमॅटीक्सने म्हटले की कंपन्यांना मार्जिन राखण्यासाठी किंमती किलोमागे 6-8 रुपयांनी वाढवाव्या लागतील.

नक्की वाचा : 1 नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम, 5 मोेठे बदल होणार

IIFL सिक्युरिटीजने म्हटलंय की, गॅस पूर्ततेवर झालेल्या परिणामांमुळे कंपन्यांना नजिकच्या काळात सीएनजीचे दर वाढवावे लागतील. मात्र महाराष्ट्रातील निवडणुकांमुळे सीएनजीचे दर वाढवले जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर दबाव असेल. सुरुवातीला विविध सण, उत्सव यांच्यामुळे कंपन्यांवर दबाव होता त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे किंमती न वाढवण्याचा कंपन्यांवर दबाव आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर कधीही या दरवाढीची घोषणा केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com