
Kalyan Dengue Death Case: कल्याणमध्ये डेंग्यूने डोके वर काढले असून या आजाराने पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिमेथील बेतुरकरपाडा या परिसरात राहणाऱ्या विलास म्हात्रे या तरुणाचा डेंग्युमूळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. आतापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंग्यूचे 35 रुग्ण आढळलेले आहेत. तर जवळपास तीनशे पन्नास घरांजवळ कंटेनर आणि ड्रममध्ये डेंग्यूच्या आळ्या देखील सापडल्यात. या प्रकाराने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे.
Dengue : पावसाळ्यात डेंग्यूपासून संरक्षण कसे करणार? 'या' पद्धतीनं घ्या काळजी
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील विलास म्हात्रे या तरुणाचा डेंग्युने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत केडीएमसी रुग्णालयात नारळ फोडले. तर केडीएमसीकडून सर्व उपायोजा सुरु आहे असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे.
'ईडा पिडा टळू दे, केडीएमसीतील नागरीकांचे आरोग्य सुधारु दे' असे बोलत मनसे कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयात नारळ फोडले. डेंग्युमुळे विलास म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेच्या निषेधार्थ मनसेने निषेध आंदोलन केले. विलास म्हात्रे हा घरातील कमाविता एकूलता एक होता, त्याचे कुटुंब निराधार झाले आहे.
महापालिकेने त्याच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करावी. अन्यथा मनसे महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.
;'हे' 5 उपाय केल्यास तुमच्या जवळपासही फिरकणार नाही डेंग्यूचा डास
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world