जाहिरात

'मंत्री खेळतात रमी, तिथे कायदा व सुव्यवस्थेची काय हमी?' वाढत्या गुन्हेगारीवरून युवक काँग्रेस आक्रमक 

अमरावती शहरात खुलेआम गुटखा, वरली मटका, एमडी ड्रग्स, गांजाची विक्री होतं असल्याने तरुणाई गुन्हेगारी घटनांमध्ये ओढल्या जात असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

'मंत्री खेळतात रमी, तिथे कायदा व सुव्यवस्थेची काय हमी?' वाढत्या गुन्हेगारीवरून युवक काँग्रेस आक्रमक 

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : अमरावती शहरातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, गुटखा-गांजा, एमडी ड्रग्सची खुलेआम विक्री यावरून आक्रमक होत युवक काँग्रेसने पोलिसांना धारेवर धरत "मंत्री खेळतात रमी, तिथे कायदा व सुव्यवस्थेची काय हमी" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. गुन्हेगारीच्या घटनांना तातडीने आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, वैभव देशमुख, सागर कलाने यांनी दिला आहे. 

अमरावती शहरात खुलेआम गुटखा, वरली मटका, एमडी ड्रग्स, गांजाची विक्री होतं असल्याने तरुणाई गुन्हेगारी घटनांमध्ये ओढल्या जात असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी (6 ऑगस्ट 2025) शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन दिले. दरम्यान शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, शहरवासीयांमध्ये निर्माण होत असलेले भीतीचे वातावरण, गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीनांचा समावेश, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या निर्घून हत्या आदी प्रश्नांवरून पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधून घेतले.

Manikrao Kokate News: रम्मीचा डाव भोवला! माणिकराव कोकाटेंची क्रीडा खात्यावर उचलबांगडी, नवे कृषिमंत्री कोण?

नक्की वाचा -  Manikrao Kokate News: रम्मीचा डाव भोवला! माणिकराव कोकाटेंची क्रीडा खात्यावर उचलबांगडी, नवे कृषिमंत्री कोण?

गुन्हेगारी घटनांवर पोलिसांनी तातडीने आळा घालावा अशी मागणी युवक काँग्रेसने यावेळी केली आहे.  नाही तर युवक काँग्रेस भविष्यात यापेक्षाही आक्रमक भूमिका घेईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना म्हणाले, अल्पवयीन मुलं गुन्हेगारी वृत्तीकडे ओढले जात असेल तर पालकांचीही जबाबदारी आहे की, त्यांनी मुलांकडे लक्ष द्यावे. अवैध धंदे किंवा इतर बाबींची माहिती पोलिसांना दिली तर पोलीस त्यावर तातडीने कार्यवाही करतील.

नियमितपणे पोलीस विभागाची कारवाही सुरू आहे. मात्र प्रलंबित गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याने पोलीस विभागावर देखील ताण येत असल्याचे त्यांनी म्हटले. तर पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर हातात फलक घेऊन युवक काँग्रेसने निदर्शने केली. गुटखा, गांजा, एमडी ड्रग्सची विक्री, तत्काळ थांबवा जुगाराची चक्री, मंत्री खेळता रमी तिथे कायदा व सुव्यवस्थेची काय हमी, दारू, ड्रग्स, गांजा आणि गुटखा शहरातील तरुणाईला व्यसनाचा विळखा अशा आशयाचे फलक युवक काँग्रेसने हातात घेऊन शहरातील गुन्हेगारीच्या घटनांवरून पोलीस विभागाचे लक्ष वेधून घेतले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com