दिग्गजांना वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी, पण अजित पवारांनी ठेवली मोठी अट

पक्षातील जेष्ठ सदस्यांना मंत्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या ऐवजी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं असलं तरी त्यांच्या समोर अजित पवारांनी एक मोठी अट ठेवली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपद आली आहे. अशा वेळी अनेक जण हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. त्यातून मार्ग काढणे हे अवघड आहे. प्रत्येकाला संधी देता येणार नाही असं अजित पवारांनी सांगितलं. त्यात त्यांनी काही कठोर निर्णयही घेतले आहे. पक्षातील जेष्ठ सदस्यांना मंत्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या ऐवजी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं असलं तरी त्यांच्या समोर अजित पवारांनी एक मोठी अट ठेवली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहे. त्याच बरोबर महामंडळ वाटपा बाबतही त्यांनी सुचक विधान केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 9 मंत्रिपदं आली आहेत. नव्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यात जेष्ठ नेत्यांना अजित पवारांनी वगळले आहे. त्यात दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धर्मारावबाबा आत्राम, या नेत्यांचा समावेश आहे. या जेष्ठांना वगळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या ऐवजी दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील या नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदासाठी संधी दिली जात आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?

राष्ट्रवादीच्या कोट्यातील सर्व 9 जागा भरल्या जाणार आहेत. असं असलं तरी अजित पवारांनी या सर्वा समोर एक अट ठेवली आहे. ती म्हणजे ही मंत्रिपद अडीच वर्षासाठी असणार आहेत. त्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यामुळे या अडीच वर्षात कामाचा ठसा उमटवा. अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. अडीच अडीच वर्षा मुळे दुसऱ्या टप्प्यात आणखी 9 जणांना संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिपदं देताना मर्यादा असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  आमदारकीचा चौकर अन् आता मंत्री; कोण आहेत मंत्रिपदाची शपथ घेणारे शिंदेंचे विश्वासू संजय शिरसाट?

मंत्रिपदं जरी देता आली नाही तरी महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर वर्णी लावली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलं. तुम्हाला जास्त काळ ताटकळत ठेवणार नाही. महामंडळाच्या नियुक्त्या पुढील दोन तीन महिन्यात केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मंत्रिपदाची संधी हुकलेल्या नेत्यांना महामंडळ मिळण्याची आशा आहे. शिवाय ते लवकरच वाटप केलं जाणार असल्याने अजित पवारांनी सांगितले. नागपूरात पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी हे आश्वासन दिलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ,मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदासाठी संधी देण्यात येणार आहे. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्माराव बाबा अत्राम यांना मात्र वगळण्यात आलं आहे. जेष्ठ असूनही मंत्रीमंडळात संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी नागपूर इथल्या पक्षाच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली होती अशी चर्चा आहे. त्यामुळे भुजबळांची नाराजी पवार कशी दुर करणार हे पहावं लागेल.